Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची होणार पडताळणी अन् अर्ज…’ : मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 2 January 2025, 19:52

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सद्या खूप चर्चेत आहे. अशातच मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत आहोत, असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितले.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?

आदिती तटकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या. आधार कार्ड मिस मॅचच्या तक्रारी आल्या होत्या. ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणीची यंत्रणा तयार करत आहोत, असं देखील त्यांनी सांगितले.

शासन निर्णयात बदल होणार नाही..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. काही महिलांकडून ऑनलाइन अर्ज आणि ऑफलाइन अर्ज आले होते. काही महिलांचं लग्नानंतर स्थलांतर देखील झालं असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. चारचाकी वाहनं ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल, असं देखील आदिती तटकरे म्हणाल्या. आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार पात्र असणार नाहीत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.

लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये कधी?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत महिलांच्या खात्यात प्रत्येकी 9 हजार रुपये जमा झाले आहेत. डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. महायुतीनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणं राज्य सरकार लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

उरुळी कांचन येथे अज्ञात चोरट्यांकडून घरफोडी; रोख रकमेसह पाऊणे तीन लाखांचा ऐवज लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp