मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या सेवानिवृत्तीनंतर राज्याला नव्या मुख्य सचिवाची प्रतीक्षा लागली होती. ही प्रतीक्षा आता संपली असून, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजस्थानचे मूळ रहिवासी व १९८८ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी राजेश कुमार मीणा यांनी ३० जून २०२५ रोजी निवृत्त मुख्य सचिव सुजाता सौनिक याची जागा घेतली आहे. त्यांच्या नियुक्तीने सवाई माधोपूर आणि संपूर्ण राजस्थानमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. राजेश मीणा हे माजी खासदार जसकौर मीणा यांचे जावई आहेत.
अलिकडेच त्यांची २९ जुलै २०२४ रोजी उत्तर प्रदेशचे गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था, पोलिस सुधारणा आणि गुन्हेगारी नियंत्रण यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर काम पहिले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील सांभाळल्या आहेत. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि विभागीय सचिव यासारख्या पदांचा समावेश आहे.

कोण आहेत राजेश कुमार मीणा ?

राजेश कुमार मीणा यांचा जन्म उनियारा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजस्थानमध्ये झाले. १९८८ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते आयएएस अधिकारी झाले. राजेश मीणा यांनी उत्तर प्रदेश केडरमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ते माजी भाजप खासदार जसकौर मीणा यांच्या मोठ्या कन्या अर्चना मीणा यांचे पती आहेत. राजेश मीणा यांचे वडील रामगोपाल मीणा हे सवाईमाधोपूर पीजी कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांच्या पत्नी अर्चना मीणा या सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे राज्यातील सर्वोच्च आयएएस पद आहे, जे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून कार्य करते.







