मुंबई: मुंबई महापालिका (Political News) निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय मैदानावर मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत जागावाटपावरून ठिणगी पडली असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यातील युती धोक्यात आल्याचे चित्र आहे. रात्री दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली, पण त्यातून कोणताही ठोस निर्णय निघाला नाही. या मतभेदामुळे आता शरद पवार यांचा पक्ष काँग्रेससोबत चर्चा करण्याच्या विचारात आहे.

या वादाचे मुख्य कारण म्हणजे काही खास जागांवरून दोन्ही पक्षांनी धरलेला आग्रह हा आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने कुर्ला, विक्रोळी आणि धारावी यांसारख्या भागांत विजय मिळवला होता. त्यामुळे या जागा आपल्यालाच मिळाव्यात असा राष्ट्रवादीचा दावा आहे, मात्र शिवसेनेने या जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. शरद पवार यांच्या पक्षाने एकूण 30 जागांचा प्रस्ताव दिला होता, पण शिवसेनेने त्यांना केवळ 15 ते 20 जागांवर समाधान मानण्यास सांगितले आहे. यामुळे जागावाटपाची ही चर्चा आता फिस्कटल्यात जमा आहे.
आज दोन्ही भाऊ शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतील. मुंबईसह इतर सात नगरपालिकांमध्येही ही युती एकत्र निवडणूक लढवणार आहे. मुंबईची ही लढाई ठाकरे घराण्याच्या राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जागावाटपाचा हा नवा फॉर्म्युला आणि महाविकास आघाडीतील फूट यामुळे मुंबईच्या राजकारणाला आता कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







