Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप; लखनभैया फेक एन्काऊंटर प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 19 March 2024, 17:09

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २००६ च्या लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं असून उच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

 

नोव्हेंबर २००६ च्या लखन भैया बनावट चकमक प्रकरणातील बारा आरोपींना ट्रायल कोर्टाने ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. ट्रायल कोर्टाने १३ अन्य आरोपींना दोषी ठरवले होते आणि प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र हायकोर्टाने प्रदीप शर्माची निर्दोष सुटका रद्द केली आणि पुराव्याच्या मालिकेच्या आधारे त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण १३ आरोपींना हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. प्रदीप शर्मा हे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातीलही आरोपी आहेत.

दरम्यान, या प्रकरणात एकूण १६ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल देण्यात आला. या निकालात २००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लखन भैया एन्काऊंटर प्रकरण काय?

राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैया हा गँगस्टर होता, तसेच तो अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा मनाला जात होता. मुंबईत तो छोटा राजनसाठी काम करत होता. प्रदीप शर्मा आणि त्यांच्या पथकाकडून लखन भैयाला वाशी या ठिकाणाहून उचलण्यात आलं होत. त्यावेळी त्याच्याबरोबर अनिल भेडा हा व्यक्ती देखील होता.

याच दिवशी संध्याकाळी मुंबईतल्या वर्सोवा या ठिकाणी असलेल्या नाना-नानी पार्कमध्ये लखन भैय्याचं एन्काऊंटर करण्यात आलं. २००६ मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल देण्यात आला असून प्रदीप शर्मांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत एक अधिकारी होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नावावर 100 हून अधिक चकमकींचा विक्रम आहे. ते १९८३ च्या बॅचचे अधिकारी असून २०२० मध्ये ते निवृत्त होणार होते. मात्र 2019 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र राजकारणात त्यांना अपयश आलं.

प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. यानंतर, 25 फेब्रुवारी 2021 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलिया बाहेर स्फोटक पदार्थ सापडल्याच्या प्रकरणामुळे ते पुन्हा अडचणीत आले. याप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Prashant Kishor Prediction For west Bengal BJP TMC Seats loksabha election 2024

पश्चिम बंगालमध्ये भाजप दमदार कामगिरी करणार, ममता बनर्जी यांच्या पक्षापेक्षा जास्त जागा जिंकणार; प्रशांत किशोर यांचा दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.