Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gauri Garje Suicide: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या सासऱ्याने FIR मध्ये काय म्हटलंय?  FIR समोर, वाचा… 

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 23 November 2025, 16:19
Gauri Garje Suicide: What did Pankaja Munde's PA Anant Garje's father-in-law say in the FIR? Read the FIR in front of him...

Pankaja Munde’s PA Anant Garje Gauri Garje: भाजपच्या नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. लग्न होऊन केवळ ९ महिन्यातच हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे यांच्यावर हत्येचा आरोप करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये अनंत गर्जेविरोधात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. गौरीच्या वडिलांनी अनंत गर्जे, त्याचा भाऊ आणि बहिणीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

त्यांनी पोलिसांना दिलेली फिर्याद जशास तशी.

 

दिलेल्या फिर्यादिनुसार, मुलगी गौरी ही मुंबईमध्ये रहावयास होती त्यावेळी ती मला व माझी पत्नी अलकनंदा हिचेशी फोनवर बोलत असे त्यावेळी ती मला व माझी पत्नी हिला सांगत असे की, अनंत हा तिच्या घरगुती किरकोळ कारणावरुन सतत वाद घालत असे. त्यावेळी मी व माझी पत्नी तिला समजविण्याचा प्रयत्न करत असे की, त्यांना कामाचा त्रास होत असेल त्यामुळे वाद होत असतील. तिने मोबाईलवरून माझ्या मोबाईल क्रमांकवर व्हॉट्सअँपद्वारे काही फोटो पाठवले. दिनांक 30/09/2025 रोजी संध्याकाळी 07.00 वाजण्याच्या सुमारास माझी मुलगी गौरी हिने तिच्या ते फोटो मी पाहिले असता, त्यामध्ये दिनांक 16/11/2021 रोजीचे ममता हॉस्पिटल, लातूर येथील गर्भवती स्त्रीचे संमतीपत्र आणि जाहीरनामा असल्याचे दिसले. त्यामध्ये श्रीमती किरण सिध्दार्थ इंगळे असे महिलेचे नाव असून तिच्या पतीचे नाव अनंत भगवान गर्जे असे नमुद होते. त्या कागदपत्रावरुन अनंत याचे किरण या महिलेशी काहीतरी संबंध असल्याचे मला वाटले म्हणून मी तात्काळ गौरीला फोनद्वारे संपर्क करून तिला सदर कागदपत्राबाबत विचारले असता गौरीने सदरचे कागदपत्र हे तिला घर शिफ्ट करतांना मिळून आल्याचे रडत सांगत होती. तेव्हा तिला आम्ही तुझ्याकडे येतो तू रडू नकोस शांत बस असे सांगितले, तेव्हा तिने मला आपण येऊ नका, आपण आलात तर अनंत हा तिला तिचे नाव चिठ्ठीत लिहुन आत्महत्या करीन अशी धमकी देत आहे असे सांगितले. तसेच तिने मला अनंत व किरण सिध्दार्थ इंगळे यांच्या अफेयर बाबत माझा दीर अजय, नणंद शीतल राजेंद्र आंधळे यांना यापूर्वी माहित होते व तिने त्याबदल नणंद शीतल सोबत अनंतच्या अफेयर बाबत बोलले होते, परंतु नणंद शीतल हिने तिला तुझे अनंत सोबत जमले नाही तर मी माझ्या भावाचे दुसरे लग्न लावीन अशी धमकी देत असल्याचे सांगितले. त्यानंतर माझी पत्नी अलकनंदा हिने गौरी हिची नणंद शीतल यांना फोन करून सदरबाबत विचारले असता, शीतल हिने आम्ही आमचं बघून घेवू म्हणत फोन ठेवला.

दिनांक 03/10/2025 रोजी माझा जावई अनंत याचा वाढदिवस असल्याने मी व माझी पत्नी गौरीकडे मुंबईला जाणार होतो. पण गौरीने आम्हाला फोनवरून कळविले की, तुम्ही माझ्याकडे मुंबईला येवू नका असे रडत रडत सांगत होती. तरी सुद्ध आम्हाला तिची काळजी वाटत असल्याने अनंत याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरीला कोणतीही पूर्व कल्पना न देता दिनांक 03/10/2025 रोजी सकाळी 06.30 वाजण्याच्या सुमारास मी व माझी पत्नी असे गौरी हिच्या मुंबई येथील वरळी येथील रुमवर आलो होतो. त्यावेळी ती आम्हाला म्हणाली की, तुम्ही कशाला घरी आलात, अनंत माझ्यावर रागावतील असे म्हणत होती. तेव्हा मी तिला अनंतच्या अफेयर बाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही असे सांगितले होते. तेव्हा ती शांत झाली. त्यावेळी आम्हाला गौरी हिचे चेहऱ्यावर व गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले. तेव्हा मी व माझे पत्नीने गौरी हिला त्या जखमांबाबत विचारणा केली असता, गौरी हिने आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली. यांनतर तिच्याकडे आम्ही अधिकची चौकशी केली असता तिने आम्हाला सांगितले की, तिचा दीर अजय याने याआधीच तिला अनंतच्या आणि किरण सिध्दार्थ इंगळे हिचेसोबत असलेल्या अफेयर बाबत सांगितले होते, परंतु ते तिने मनावर घेतले नव्हते. पण गौरी हि नविन घरी शिफ्ट करत असताना तिला किरण हिचे प्रेग्नंट असल्याचे कागदपत्र सापडले होते. त्या कागदप‌त्रामध्ये तिचा पती म्हणून अनंत याचे नाव नमुद होते, त्यामुळे ती नाराज होती.

सदरबाबत तिने अनंत यास विचारले असता त्याने तुला काय करायचे ते कर मी कोणाला घाबरत नाही, जर तू याबददल कोणाला सांगितले तर तुझे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर आम्ही संध्याकाळी जावई अनंतचा वाढदिवस साजरा करून रात्री 08.00 वाजण्याच्या सुमारास परत बीडला निघुन गेलो,

दि 21/11/2025 रोजी जावई अनंत याने रात्री 10.15 वाजता माझे मोबाईलवर दोन मिसकॉल आले होते. परंतु मी बाथरूमला गेलो असल्याने कॉल उचलू शकलो नाही. त्यानंतर मी जावई अनंत यांना फोन केला असता अनंत यांनी फोन उचलला नाही म्हणून मी गौरीला फोन करून विचारपूस केली असता तिने सर्व ठीक असल्याचे सांगितले. काल दिनांक 22/11/2025 रोजी संध्याकाळी 6.45 या सुमारास जावई अनंत याने मला फोन करून कळविले की, मामा गौरी सुसाइड करायला लागली तिला समजावा, मी अनंतला गौरीकडे फोन देण्यास सांगिताले असता त्यांनी गौरीला फोन न देता गौरीला दवाखान्यात घेवून जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने लगेचच माझे पत्नीला कॉल करून मामी माझे समोर गौरीचे प्रेत आहे असे सांगून फोन ठेवला त्यानंतर मी व माझी पत्नी सदरवेळी एकत्रच असल्याने आम्ही अनंतला पुन्हा कॉल केला. परंतु त्याने कॉलला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आम्ही आमचे मुंबई येथे राहणारे मामेभाऊ कारभारी खेडकर या नातेवाईकांना सदरची हकीकत सांगून गौरीच्या घरी जावून माहिती घेण्यास सांगितले असता रात्री 8.00 वा दरम्यान त्यानी आम्हाला कॉल करून करून गौरी मयत झाली असून तिला सध्या नायर रुग्णालय येथे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही मुंबईला येवून नायर रुग्णालय येथे गेलो असता अनंतने गौरीने आत्महत्या केल्याचे सांगितले.

तरी माझी मुलगी नामे गौरी हीस तिचा पती अनंत गर्जे याने लग्न झाल्यानंतर काहि कालावधीतच किरकोळ कारणावरून वाद घालण्यास तसेच किरण सिध्दार्थ इंगळे या महिलेसोबत असलेले अफेरबाबत गौरी हिरा समजल्याने तिस मानसिक व शारिरिक त्रास देण्यास सुरुवात केली व जर तिने तिचे माहेरच्या लोकांना याबाबत काही सांगितले तर स्वतःचे जीवाचे काहीतरी बरेवाईट करेल अशी धमकी देवुन तिला ब्लॅकमेल करून त्रास देत असे. तसेच अनंत गर्जे यांची बहिण शीतल राजेंद्र आंधळे हि देखील गौरी हिस जर तुझे अनंत याचेशी जमत नसेल तर त्याचे दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी देत असे.

त्यानंतर दिनांक 22/11/2025 रोजी अनंत भगवान गर्जे यांनी मला फोन करून सांगितले की, गौरी हीने आत्महत्या केली आहे. म्हणुन माझी मुलगी गौरी हिच्या मृत्युस तिचा पती अनंत भगवान गर्जे, बहीण शीतल भगवान गर्जे-आंधळे, दीर अजय भगवान गर्जे हे जबाबदार असून जावई अनंत गर्जे हा गौरी हिने आत्महत्या केल्याचे सांगत असला तरी त्यामध्ये खरेच आत्महत्या आहे की काही घातपात आहे? याबाबत माझी मुलगी गौरी हिंचे आत्महत्येचा कायदेशीर तपास होवून सत्य समोर येणेबाबत तपास होऊन मला न्याय मिळावा म्हणून वरील तीन लोकांविरूध्द माझी कायदेशीर तक्रार आहे, असे गौरीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा: मोठी अपडेट..! विवाह बाह्य संबंध, गर्भपात, अन्.., ‘ती’ बाई..; दमानिया यांचा धक्कादायक खुलासा

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24
Next Post
Pune News

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'या' महत्त्वाच्या चौकातील रस्त्यांवर खोदकाम सुरू; प्रवासाला निघण्यापूर्वी पर्यायी मार्ग तपासा, अन्यथा ट्रॅफिकमध्ये अडकाल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.