Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! थेट १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास आणि मालमत्ता जप्ती; राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीचा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 November 2026, 13:32

मुंबई : राज्यातील भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने कठोर उपाययोजनांची शिफारस केली आहे. पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्ती व संस्थांना ७ ते १० वर्षांपर्यंत कारावास, किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव समितीने मांडला आहे. समितीचा दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाला सादर करण्यात आला.

संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांवर कठोर कारवाई करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. त्यानुसार अशा प्रकरणांमध्ये ७ ते १० वर्षांच्या कारावासाची तरतूद सुचवण्यात आली आहे. तसेच किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

अनुचित साधनांचा वापर करणाऱ्या उमेदवारांना ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा प्रस्ताव आहे. परीक्षा गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या सेवा पुरवठादार संस्थांना ५ कोटी रुपयांपर्यंत दंड आणि आठ वर्षांसाठी बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची सूचना असून, गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. अशा प्रकरणांमधील खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याची शिफारसही समितीने केली आहे.

या अहवालात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षार्थींसाठीही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील उमेदवाराची हरकत योग्य ठरल्यास हरकतीसाठी भरलेले शुल्कही परत देण्याचा प्रस्ताव आहे.

दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना करण्यात आली आहे. उमेदवारांना आधार किंवा MahaID द्वारे एकदाच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारसही करण्यात आली आहे. परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे.

राज्यातील रिक्त पदांची माहिती वेळेत मिळावी, यासाठी Integrated Requisition Portal विकसित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने सप्टेंबरअखेरपर्यंत भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे, अशी सूचना अहवालात आहे.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक (Venue Bank) तयार करून केंद्रांची निवड आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षा प्रक्रियेतील सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची सूचनाही समितीने केली आहे. या उपाययोजनांमुळे भरती परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यास आणि परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यास मदत होईल, असा उद्देश आहे.

राज्यातील भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२६ रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीचा दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाला सादर करण्यात आला. या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत महत्त्वाचे बदल होऊ शकतात. मात्र, या शिफारशींवर शासनाचा अंतिम निर्णय होणे बाकी आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! थेट १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास आणि मालमत्ता जप्ती; राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीचा निर्णय

Tuesday, 24 November 2026, 13:32

१० कोटींच्या बदल्यात आदिवासींची जमीन देण्याचा दावा; देवराम लांडेंची ऑडिओ क्लीप आणि व्हिडिओ व्हायरल! पुण्यात खळबळ

Tuesday, 24 November 2026, 13:29

उरुळी कांचन येथील खेळाडू धनंजय मदने यांची सुवर्णपदकांची हॅट्रिक; राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

Tuesday, 24 November 2026, 13:18

नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच! पुन्हा भरधाव ट्रक उलटला; उपाययोजना करूनही अपघात थांबेनात

Tuesday, 24 November 2026, 13:12

पुणेकरांनो बाहेर खाण्यापूर्वी ‘ही’ यादी नक्की पाहा! पुण्यातील तब्बल १८ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

Tuesday, 24 November 2026, 13:12

केसनंद व कोंढव्यातील अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात; गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

Tuesday, 24 November 2026, 12:49
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp