Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ग्लोईंग, हायड्रेटेड आणि यंग स्किन हवी, फक्त ‘तीन’ फळांचा डाएटमध्ये समावेश करा, आठवडाभरातच फरक दिसेल!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 22 February 2024, 8:00

ग्लोईंग , हायड्रेटेड आणि यंग स्किन आज कोणाला नको? आपल्यापैकी अनेकजण त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात. बाजारात मिळणारी अनेक औषधं, उत्पादनांचा वापर बेफाम वापर केला जातो. तसेच, अनेक पार्लर ट्रिटमेंट्सचाही वापर केला जातो. पम त्यापेक्षा आहारही तितकाच महत्त्वाचा ठरतो. शरीराला योग्य पोषण देणं यापेक्षा काय महत्त्वाचं आहे. खरं तर, जर तुम्ही सकस आहार केला तर तुम्ही कोणत्याही क्रीम किंवा केमिकलच्या मदतीशिवाय तुमची त्वचा चमकदार करू शकता.

निरोगी आहार ही निरोगी त्वचेची गुरुकिल्ली आहे. फळं तुम्हाला तुमचं शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करू शकतात. फळांमध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं असतं, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. फळे जीवनसत्त्वे, मिनिरल्स आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक तत्वांनी भरलेली असतात, जी तुमच्या त्वचेला पोषण देतात आणि तरुण बनवतात.

सफरचंद
‘An Apple A Day Keep Doctors Away’ हे तत्व आपल्या सर्वांना माहीत आहेच. सफरचंद हा पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यात फायबर, व्हिटॅमिन ए, बी यासह अनेक पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढतात. शरीरातील वृद्धत्व वाढवण्यासाठी फ्री रॅडिकल्स जबाबदार असतात. पेशींना हानी पोहोचवण्याबरोबरच, यामुळे आपल्या त्वचेवरही वाढत्या वयाच्या खुणा दिसतात. अशा परिस्थितीत सफरचंदात असलेले पोषक तत्व या फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि आपल्या त्वचेचं संरक्षण करतात.

बेरी
स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरी यांसारख्या बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्स असतात. जी शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करतात. याशिवाय, ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतात आणि त्वचेची छिद्र उघडतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. त्यात असं एन्झाइम आढळतात, जे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतात आणि चेहऱ्यावर चमक वाढवतात. तसेच यामुळे नव्या पेशी वाढवून त्वचेचा पोत सुधारतो.

संत्री
संत्री म्हणजे, व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं जीवनसत्व आहे. कोलेजन सिंथेसिससाठी व्हिटॅमिन सी देखील आवश्यक आहे, जे स्किन टाईट ठेवतं आणि चेहऱ्यावर सुरकुत्या रोखतं. यामुळे त्वचेचं तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय व्हिटॅमिन सी त्वचेला दुरुस्त करण्याचं काम करतं. संत्र्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, जे त्वचेची जळजळ, त्वचेवरील लालसरपण कमी करण्यास मदत करतात.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पीक विम्याचे अर्ज अपात्र ठरले? शेतकऱ्यांच्या पीक विम्याची पुन्हा होणार तपासणी; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Tuesday, 27 October 2026, 12:41

लग्नाच्या घरात अचानक मृत्यूचं तांडव! शेजाऱ्याशी वाद अन् पुढच्या काही क्षणांत 3 जणांची हत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 27 October 2026, 12:32

खेडमध्ये सोसायटीच्या मेंटेनन्सच्या वादातून पाच फ्लॅटचे पाणी कनेक्शन तोडले, एकावर गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 11:52

उरुळी कांचनमधून 13 वर्षीय मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळविल्याचा आईचा आरोप

Tuesday, 27 October 2026, 11:42

दौंडमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण जखमी

Tuesday, 27 October 2026, 11:28

सय्यदनगरमध्ये मध्यरात्री तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला

Tuesday, 27 October 2026, 11:21
Next Post

शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांना धमकीचा मेसेज; प्रशांत जगताप यांची पोलिसांत तक्रार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp