Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले, अन् चोरट्यांनी घर फोडले! राहू गावात रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 July 2026, 19:15

पुणे : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारत रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ८२ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. एवढ्यावरच न थांबता शेजाऱ्याच्या घरासमोर उभी असलेली स्प्लेंडर मोटारसायकलही चोरून नेल्याने राहू (ता. दौंड) गावात खळबळ उडाली आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र किसन गजरे (वय ५४, रा. समतानगर, राहू) हे पत्नी, मुलगा आणि भावासह आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.२४ जुलै रोजी रात्री घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील लॉकर फोडून ३० हजार रुपयांची रोकड, सोन्याच्या अंगठ्या, चैन, कर्णफुले, टॉप्स तसेच चांदीचे दागिने असा एकूण ८२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान, गजरे यांच्या मुलाने पहाटे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्याने तात्काळ शेजारी आणि गावातील पोलीस पाटील यांना माहिती दिली. त्यांनी पाहणी केल्यानंतर घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गजरे कुटुंब तातडीने पंढरपूरहून राहू येथे परतले.

 

चोरट्यांनी गजरे यांच्या भावाच्या घराचाही दरवाजा तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र, त्या घरातून कोणतीही चोरी झालेली नसल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले. याच रात्री गावातील अविनाश चंदर नवले यांच्या घरासमोर हँडल लॉक करून उभी केलेली हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-४२ एझेड-७९६३) ही मोटारसायकलही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात घरफोडी आणि वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार भोर पुढील तपास करीत आहेत. गावात एकाच रात्री घरफोडी आणि मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले, अन् चोरट्यांनी घर फोडले! राहू गावात रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला

Saturday, 25 July 2026, 19:15

उरुळी कांचन होणार ‘लॉजिस्टिक पार्क’ ; उन्नत मार्गातून मेट्रो उरुळी कांचनपर्यंत आणणार ; आमदार माऊली कटकेंचा विश्वास

Saturday, 25 July 2026, 19:02

भोर तालुक्यात पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा; झाडे कोसळली, घरांचे पत्रे उडाले

Saturday, 25 July 2026, 18:35

​उरुळी कांचनमध्ये जलजीवनच्या कामामुळे पुणे–सोलापूर महामार्गाची दुर्दशा ; आधी डांबरीकरण करा, मगच पुढचा रस्ता खोदा, तरुणांनी थांबवले काम..

Saturday, 25 July 2026, 18:19

आईला जाब विचारला अन् भावाचा संताप अनावर! मंतरवाडीत सख्ख्या भावालाच विटेने मारहाण

Saturday, 25 July 2026, 18:06

नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता पावसातच उखडला; चेलाडी फ्लायओव्हर परिसरात खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका

Saturday, 25 July 2026, 17:51
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.