Beed Crime: मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना बीड जिल्ह्यातील पोलिसांचा धाक उरलाच नाही अशी चर्चा सुरु आहे. बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शेतीच्या वादातून चार जणांना बेदम मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Beed Crime)

समोरा आलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील उडंद तालुक्यातील वडगाव गावात ही घटना घडली आहे. शेतीच्या वादातून चार जणांना लोखंडी रॉड घेऊन मारण्यात आले आहे. कुटुंबातील सदस्यांनीच चार जणांना मारले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
लोखंडी पाईप, रॉड आणि काठ्या घेऊन मारहाण केली. या मारहाणीची व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अमानुष प्रकार पाहून नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला. मारहाणीत चौघे ही गंभीर जखमी झाले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सद्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
हेही वाचा – दादांच्या लाडक्याला अभय? मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात ‘या’ तारखेपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदतवाढ
या घटनेची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या संबंधित पोलीस प्राथमिक तपास करत आहे. शेतीच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. लवकरात लवकर या घटनेची कारवाई करावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी वर्तवली आहे.






