Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: कोरेगाव मूळ येथे घरफोडी! साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अनेक घरफोड्या व चोरीच्या घटना अद्याप ‘अनडिटेक्ट’च

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 13 November 2025, 17:43
Uruli Kanchan News: Burglary at Koregaon Mool! Property worth Rs 4.5 lakhs looted; Many burglaries and thefts still undetected

उरुळी कांचन, (पुणे): घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती परिसरात सोमवारी (ता. 10) सायंकाळी चार ते मंगळवारी (ता. 11) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Uruli Kanchan Crime)

 

याप्रकरणी सुनिल लक्ष्मण कानकाटे (वय- 58, व्यवसाय शेती मुळ रा. इनामदार वस्ती, कोरेगाव मुऴ ता. हवेली, सध्या रा. आदित्य नगर हडपसर ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल कानकाटे हे हडपसर परिसरात राहत असून त्यांच्या आई या कोरेगाव मूळ हद्दीतील इनामदारवस्ती परिसरात राहतात. त्यांच्या आई सुभद्रा लक्ष्मण कानकाटे या आजारी असल्याने दोन दिवस रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना रुग्णालयातून घरी आणले, यावेळी त्यांच्या बंद राहत्या घराचे कुलुप कोणातरी अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी साहाय्याने तोडल्याचे दिसून आले.

घरात जाऊन पाहणी केली असता घरातील 50 हजार रुपये रोख रक्कम, सोन्याची पोत, सोन्याची अंगठी, कानातील कर्नफुले असे चार लाखांचे दागिने आढळून आले नाहीत. यावरून घरात चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, याप्रकरणी अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा साडे चार लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात BNS 305(A),331(3),331(4) विविध कलमान्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत.

अनेक घरफोड्या व चोरीच्या घटनांचा अद्याप तपास नाहीच..

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक दुचाकी व चारचाकी गाडी चोरीला गेल्या आहेत. तसेच पुणे-सोलापूर महामार्गावर मोठमोठे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना आपल्या जीवाशी मुकावे लागले आहे. या अपघातात अज्ञात वाहने धडक देऊन निघून गेली. मात्र, त्या वाहनांचा व चालकांचा अजूनही थांगपत्ता मिळू शकला नाही. तसेच अनेक घरफोड्या व वाहने चोरीच्या घटना अद्याप ‘अनडिटेक्ट’च आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Purandar Airport News

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी अखेर निधी मंजूर; पुण्याच्या प्रगतीला मिळणार ‘सुपरफास्ट’ गती

Wednesday, 1 April 2026, 15:16
'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

पोलीस कोठडीत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; अकोल्यातील घटनेने खळबळ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Next Post

Pune Crime: बोडकेवाडी फाट्यावर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आरोपींकडून 4 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.