Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Urali Kanchan : अष्टापूर येथील महिलेवरील हल्ल्यानंतर उरुळी कांचन परिसरात बिबट्याचे आगमन नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 16 December 2025, 19:21
Urali Kanchan

photo- social media

Urali Kanchan : पूर्व हवेलीतील कोलवडी, कोरेगाव मूळ, अष्टापूर, व उरुळी कांचन परिसरात मगील काही दिवसांपासून बिबट्या धुमाकूळ घालत असून, पुन्हा एकदा बिबट्याची दहशत शिगेला पोहोचली आहे. बिबट्याच्या सततच्या दर्शनामुळे आणि हल्ल्यांमुळे पूर्व हवेली परिसरात मोठे भय निर्माण झाले आहे. वन विभागाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी जनतेतून होत आहे. (Urali Kanchan)

 

कोरेगाव मूळ ते उरुळी कांचन हद्दीतील दत्तवाडी परिसरात मंगळवारी (ता. 15) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास कॅनलच्या कडेला असलेल्या रस्त्याच्या बाजूला दोन बिबटे दिसून आले असल्याची माहिती साहिल सुनील कड यांनी दिली आहे. त्यामुळे बिबट्याचे उरुळी कांचन परिसरात आगमन झाल्याने शेतकरी व नागरिकांचे टेंशन वाढले आहे. (Urali Kanchan)

दशक्रिया विधीसाठी निघालेल्या अष्टापूर (ता. हवेली) येथील अंजना वाल्मिक कोतवाल यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने मंगळवारी (ता. 09) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास अचानक झडप घातली. यामध्ये कोतवाल या गंभीर जखमी झाल्या होत्या. कोरेगाव मूळ (ता. हवेली) शिवारामध्ये गुरुवारी (ता.11) मध्यरात्री बिबट्याने चवरुका मळा वस्ती येथे दोन घरगुती श्वानांणा घेऊन जाऊन एका लहान पिल्लावर हल्ला करून त्याचा प्राण घेतला आणि श्वानांचे मांस भक्ष्य केले होते.

कोलवडी (ता. हवेली) येथील शितोळे वस्ती येथील प्रमोद शितोळे यांच्या घराच्या बाहेर मंगळवारी (ता. 15) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास बाहेर बिबट्या फिरतानाचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घराचा दरवाजा उघडा नसल्याने मोठा अनर्थ टळला. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरातील विविध गावांमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने सोशल मीडियावर माहिती पसरत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत वाढली आहे.

वनविभागाचे कर्मचारी वेगवेगळे टिम करून गस्त घालत आहे. मात्र, बिबट्या सर्वाना गुंगारा देत, गावपाड्यांत मुक्त संचार करत आहे. अष्टापूर येथे लावलेल्या पिंजऱ्यात अद्यापतरी बिबट्या अडकलेला नाही.

दरम्यान, सध्या या परिसरात दिवसेंदिवस उसाचे क्षेत्र वाढले असून बिबट्यांना लपण्याची सोय मोठ्या प्रमाणात झाली आहे; परंतु या ठिकाणी असलेल्या बिबट्यांना कुठल्याही प्रकारचे खाद्य मिळत नसल्याने पाळीव प्राण्यांवर तसेच माणसांवर हल्ले करू लागले आहेत. तरी या ठिकाणी असलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी वन खात्याने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी जोर धरू लगली आहे.

वन विभाग सातत्याने या परिसरामध्ये जनजागृती करीत आहेत. मात्र, या घटना घडल्यामुळे सामान्य नागरिक महिला शेतीमध्ये काम करण्यासाठी टाळाटाळ करीत असून लोक सामूहिकरीत्या काम करण्यासाठी जात आहेत. वन खात्याने अष्टापूर परिसरात पिंजरा बसवला असला तरी गेले आठ दिवस एकही बिबट्या जेरबंद झालेला नाही. दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांची हालचालही कमी झाली आहे.

सचिन कड, सामाजिक कार्यकर्ते, कोरेगाव मूळ, (ता. हवेली)

सध्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. तसेच काही नागरिक एआय जनरेटेड फोटो बनवत आहेत. त्यसाठी रेस्कू टीमकडून पडताळणी सुरु आहे. जसजसा फोन येईल तशा प्रकारे त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी भेट देत आहेत. trap लावतो अत्यंत सेन्सिटिव्ह घटना असेल तर त्या ठिकाणी पिंजरा लावला जात आहे.

राज वरख, वनपरीक्षक, हवेली

नुकतेच कोलवडी येथील शितोळे वस्तीवर सायंकाळी सात वाजता बिबट्या घराच्या बाजूला वारंवार फेरे मारत होता. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून बिबट्यांच्या बंदोबस्ताबाबत पूर्वीच निवेदन दिले आहे. परंतू पुणे शहरालगत सर्वच परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने, वनविभागाने सर्वच ठिकाणी पिंजरे लावले आहेत, यामुळे पिंजरे कमी पडत आहेत. त्यामुळे वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी. तसेच नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात.

युवराज काकडे, आरोग्यदूत, थेऊर, ता. हवेली

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

Daund News: दौंड तालुक्यात मोठी चोरी! वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटच्या डी. पी. मधली 770 किलोची तांब्याची तार लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.