Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विवाह ठरत नसल्याने पुण्यातील हॉटेलमध्ये तरुणाची पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या ! मित्रांना पाठविला ‘शेवटची भेट’चा संदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 November 2026, 9:24

पुणे : पुण्यातील खराडी भागात एका हॉटेलमध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 35 ते 40 वयोगटातील या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अक्षय कालिदास कांबळे (वय -26, रा. पूर्वरंग सोसायटी, पेरणे फाटा, पुणे-अहिल्यानगर रस्ता) असे मृत तरुणाचे नाव आहे.हा तरुण कोरेगाव भीमा येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता..

27 ऑक्टोबर रोजी हा तरुण खराडीतील तुळजाभवानीनगर येथील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत राहण्यासाठी आला होता. 29 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत तो खोलीबाहेर आला नाही. हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावूनही आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी लगेच खराडी पोलिसांना याबाबत कळवले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा उघडून पाहिल्यावर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आणि त्याच्या हातात पिस्तूल होते. त्याच्या कपाळावर मधोमध गोळी लागल्याची खूण आढळली. पोलिसांनी तातडीने त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्याच्या वडिलांनी आणि भावाने घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली.

पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण अविवाहित होता. गेल्या काही काळापासून त्याचे लग्न ठरत नसल्यामुळे तो मानसिक तणावात आणि नैराश्यात होता. याच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.दरम्यान, आत्महत्येपूर्वी अक्षयने मित्रांना ‘आपली ही शेवटची भेट. पुढच्या जन्मी भेटू,’ असा संदेश पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक चौकशीत विवाह ठरत नसल्याने तो नैराश्यात असल्याचे समोर आले आहे. अक्षयकडे देशी बनावटीचे पिस्तूल कसे आले आणि ते त्याने कोणाकडून मिळविले, याचा पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे करीत आहेत.

या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाकडे हे पिस्तूल नेमके कुठून आणि कसे आले, याचा शोध आता पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्याचे शिवाजीनगर न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी! ई-मेल प्राप्त होताच परिसरात प्रचंड खळबळ

Monday, 2 November 2026, 16:03

अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट, नग्न व्हिडीओ कॉल अन् ज्येष्ठ व्यक्तीसोबत घडलं भयंकर; ‘ती’ एक चूक करणं पडलं महागात…

Monday, 2 November 2026, 15:54

आपटी येथे वनविभागाच्या तत्परतेने उपद्रवी वानराला पकडून नैसर्गिक अधिवासात केले मुक्त!

Monday, 2 November 2026, 15:23

ससून रुग्णालयाचा रिपोर्ट काय सांगणार? मुग्धा देशमुख प्रकरणात हत्येचा संशय; पोलीस तपासात मोठा खुलासा

Monday, 2 November 2026, 15:19

भरणेवाडीत मोफत वैरण बियाणे वाटपाचा शुभारंभ! पशुपालकांना चारा टंचाईतून दिलासा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात

Monday, 2 November 2026, 14:31

सिंहगड रोड अन् स्वारगेट ठप्प! मुसळधार पावसामुळे रस्त्यांना आले तळ्याचे स्वरूप; पुण्यात गाड्यांच्या लांबच लांब रांगा

Monday, 2 November 2026, 14:28
Next Post

कुस्ती क्षेत्रात चमकण्याची संधी!निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp