Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकणार!मोर्चापूर्वी सरकारशी ‘मोठी’ चर्चा? वाटाघाटींचे संकेत देत जरांगेंनी वाढवली सरकारची धडधड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 13 September 2026, 8:15

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईचा मार्ग धरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस असून, आंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत त्यांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिला. 15 सप्टेंबर रोजी हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार असून 19 सप्टेंबरला आंदोलक मुंबईतील प्रसिद्ध आझाद मैदानावर दाखल होतील. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज तिसऱ्यांदा मुंबईत धडकणार असून, आझाद मैदानावर ते दुसऱ्यांदा उपोषणाला बसणार आहेत.

विशेष म्हणजे गणेशोत्सवाचा काळ असतानाच हे आंदोलन जाहीर झाल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आंतरवाली सराटीहून निघणारा हा मोर्चा पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली या ठिकाणी मुक्काम करत 19 सप्टेंबरला मुंबईत पोहोचेल. मुंबईच्या या घोषणेनंतर स्थानिक समन्वयकांनी प्रवासाची व मुक्कामाची तयारी वेगाने सुरू केली आहे.

कालच्या बैठकीत जरांगे यांनी सरकारवर कोणतीही थेट टीका केली नाही. यामागे सरकारला तोडगा काढण्यासाठी आणि वाटाघाटी करण्यासाठी दिलेली ही शेवटची संधी असल्याचे मानले जात आहे. आंदोलकांना मुंबई गाठण्यासाठी 6 दिवसांचा कालावधी लागणार आहे. या काळात जर सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवला, तरीही जरांगे पाटील आझाद मैदानावर जाऊन सरकारचे आभार मानतील आणि जनतेचे अभिवादन स्वीकारतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा अंबडच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जरांगे पाटील यांच्याशी सुमारे 45 मिनिटे चर्चा केली. रात्री वैद्यकीय पथकाने त्यांच्या प्रकृतीची तपासणी देखील केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. जरांगे पाटील यांनीही मराठा समाजाला हे आंदोलन अत्यंत शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. आता पुढील दोन दिवसांत सरकार यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जुन्नरच्या राजकारणातील लढाऊ महिला नेतृत्व हरपले; आशाताई बुचके यांचे निधन

Sunday, 13 September 2026, 10:22

बाईवरील वक्तव्य भोवलं! आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

Sunday, 13 September 2026, 8:45

पुण्यात बाप्पाच्या आगमनाचा मुहूर्त ठरला! मानाचे 5 गणपती ‘या’ वेळी विराजमान होणार; पथकांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Sunday, 13 September 2026, 8:33

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकणार!मोर्चापूर्वी सरकारशी ‘मोठी’ चर्चा? वाटाघाटींचे संकेत देत जरांगेंनी वाढवली सरकारची धडधड

Sunday, 13 September 2026, 8:15

अपार्टमेंटमध्ये गोळीबाराचा आवाज अन् रहिवाशांची धावपळ! बारामतीत 28 वर्षीय तरुणाने डोक्याला पिस्तूल लावून घेतला टोकाचा निर्णय

Sunday, 13 September 2026, 8:00

उकाड्यापासून पुणेकरांना मिळणार दिलासा! गणरायासोबत पावसाचीही एन्ट्री; हवामान विभागाचा मोठा इशारा

Sunday, 13 September 2026, 7:40
Next Post

पुण्यात बाप्पाच्या आगमनाचा मुहूर्त ठरला! मानाचे 5 गणपती ‘या’ वेळी विराजमान होणार; पथकांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp