मात्र काही वेळानंतर शिक्षकांना वर्गात ती मुलगी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी लगेचच मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. पालकांनी शिक्षकाला सांगितले की, त्यांनी मुलीला शाळेतच सोडले. परंतू मुलगी शाळेत नसल्यामुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती मिळताच ते थेट शाळेत गेले. मुलगी शाळेत दिसली नाही म्हणून तिच्या मित्रमैत्रिणींना विचारपूस केली आणि दोघांनी पण घराजवळ आणि शाळेच्या आवारात शोध घेण्यास सुरुवात केली.

सगळीकडे तीचा शोध घेतला परंतू ती सापडली नाही. अखेर पालकांनी ठाणे पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिरात तपास कार्य सुरु केले. अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलीस पथक तयार करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ह फुटेज तपासण्यात येत आहे. पोलीस कुटुंब सदस्य, मित्र परिवार आणि शेजाऱ्यांची चौकशी करत आहे. मुलीसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर काजूवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.







