Pune Political News: ऐन निवडणूकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणाला हाद्रवणारी घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या घराच्या बाहेर अघोरी पूजा (Aghori Pooja) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराजवळ संशयास्पद वस्तू, लिंबू- मिरच्या, फोडलेले नारळ आणि आणखी तांत्रिक विधीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू सापडल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या पुण्यातील बारामती येथील राहत्या घराच्या बाहेर लिंबू, मिरची आणि तांत्रित विधीच्या वस्तू सापडल्या. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व साहित्य जप्त केले. पोलीस या घटनेची प्राथमिक तपास करत आहे. ही अघोरी पूजा कोणी केली आणि कोणत्या हेतूने केली याचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा– Breaking News: महायुतीत हमरीतुमरी! शिंदे सेनेचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; कारण…
या घटनेमुळे राजकाराणात वेगळीच चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या राहत्या घराच्या बाहेर अशी वस्तू आढळल्याने परिसरात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची तपासणी करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. तसेच या घटनेनंतर अजित पवार यांच्या घराबाहेर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.





