अजित जगताप
पुसेगाव : देशासाठी शूरवीरांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांच्या आठवणी जतन करणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून ललगुण ता.खटाव येथे शहिद वीर सर्जेराव शंकर भोसले यांना सलग सत्तावन्न वर्ष अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी भोसले यांनी माहिती दिली की, सेना दलात सर्जेराव भोसले यांच्या तरुणपणी केशव भोसले हे सुध्दा सेना दलात होते. सेकंद पॅराग्लायडर्स मराठा मध्ये आग्रा छावणीला १९६५ साली असताना युध्दाची चाहूल लागली होती. त्यावेळी श्री भोसले हे मध्य प्रदेशातील महू येथील हत्यार प्रशिक्षण घेत होते. दिल्ली येथे पोहण्याचा प्रशिक्षण सॊडून दोघेही लढाई साठी सज्ज झाले होते.
हत्यारी विभागात काम करीत असताना प्लाटून 11, 12 डेल्टा फोर्स मध्ये अमृतसर येथे गेले. त्याठिकाणी लष्करी रुग्णवाहिका मधून जखमी सैन्य फाजीखा सेक्टर, अमृतसर, आटारी बॉर्डर येथे रात्री एक वाजता अडकून पडले होते. त्यावेळी बॉम्बचा वर्षाव झाला. पहाटे चार वाजता शहीद सर्जेराव भोसले हे गंभीर जखमी झाले होते. हात- पाय तुटले होते. त्यावेळी सेना दलातील वरिष्ठ अधिकारी आले. त्यांनी जखमीला ताबडतोब उपचारासाठी घेऊन जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केशव भोसले हे ४३ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले.त्यांनी काश्मीर, कच्छ, बांगला देश, चीन, नेपाळ, गोवा आदी ठिकाणी युध्द लढले.
दरम्यान, गोवा मुक्ती संग्राम लढ्यात ४५० पोर्तुगीज कैद करून ठेवले होते. त्यांना सहा महिने सांभाळले, बोटीतून पाठविले एक दिवस सुध्दा ते लढू शकला नाही. अशी ही आठवण यावेळी माजी सैनिक केशव भोसले यांनी सांगितले.
यावेळी शहीद भोसले यांच्या समवेत सेनादलात काम करणारे नायब सुभेदार केशव भोसले, चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, अनिल वीर, सुनिल कदम,पत्रकार अजित जगताप, रि.पा.ई. चे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल गडांकुश, अजित नलवडे ,संतोष भंडारे, अजित कंठे,शाहिदांचे नातू नितीन भोसले, राजेंद्र भोसले, माणिक काकडे, दिलीप भोसले, नेताजी भोसले, नात सौ. खरात, किशोर झोडगे तसेच आजी- माजी सैनिक संघटना, ललगुणचे सरपंच जयवंत गोसावी, मानाजी घाडगे, संतोष घाडगे आदि मान्यवर उपस्थित होते.