Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १११ शिक्षकी पदांच्या भरतीची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. आधी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर होती. मात्र उमेदवारांच्या विनंत्या आणि काही तांत्रिक अडचणींमुळे ती वाढवून २१ डिसेंबर करण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलसचिव प्रा. ज्योती भाकरे यांनी दिली. (Pune News)

विद्यापीठ कॅम्पसमधील विविध विभागांत सहायक प्राध्यापक ४७, सहयोगी प्राध्यापक ३२ आणि प्राध्यापक ३२ अशी मिळून १११ पदे रिक्त आहेत. या भरतीसाठी ८ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले होते. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची प्रिंट काढून ती प्रशासनातील शिक्षक कक्षात जमा करण्याची शेवटची तारीख आधी १२ डिसेंबर होती.
नवीन बदलानुसार आता:
-
ऑनलाइन अर्ज २१ डिसेंबरपर्यंत करता येतील.
-
अर्जाची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे २६ डिसेंबर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष जमा करता येतील.
-
ज्यांनी आधी अर्ज भरले आहेत त्यांना अर्जातील माहिती दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल.
-
आणि ज्यांनी अजून अर्ज केला नाही, त्यांच्यासाठीही नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
विद्यापीठाने यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढून उमेदवारांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. वाढलेल्या तारखेचा फायदा होऊन अधिकाधिक पात्र उमेदवार अर्ज करतील, अशी अपेक्षा विद्यापीठाने व्यक्त केली आहे.







