Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: अखेर प्रशांत गवळीसह 11 जणांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीची तक्रार; फसवणूकीची व्याप्ती “हजारो कोटींच्या घरात”, पोलिसांच्या कारवाईवर गुंतवणूकदारांचे भवितव्य अवलंबून

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 December 2025, 14:11

विशाल कदम

 

पुणे, ता. 14 : गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंतवणूक केलेले पैसे (Pune News) बुडतील. या भीतीने गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. परंतु, आपली गुंतवणूक मिळणारच नाही. हे लक्षात आल्यानंतर अखेर 19 गुंतवणूकदार पुढे आले. आणि त्यांनी 15 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर (पुणे) येथील ‘समर्थ क्रॉप केअर’च्या प्रशांत गवळीसह 11 जणांच्या विरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. ‘समर्थ क्रॉप केअर’ सह त्याला सलग्न असणाऱ्या 23 कंपन्या पोलिसांच्या रडारवर आल्या असून पोलिसांनी चौकशी सुरु केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रशासन काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मुख्य आरोपी प्रशांत अनिल गवळी (वय -35), ज्योती प्रशांत गवळी (वय -35), नागनाथ धोंडिबा जाधव (वय -35), पंडित राठोड, दिपक कटारे,चंद्रकांत राऊत, अविष्कार सुरवसे (वरील सातही रा. लेन नं. 3, गजानन महाराज मंदीर, तुकाई दर्शन, बिजली नगर,पुणे), सुदामा दास, मोनीषा सुदामा पाने उर्फ दास, प्रकाश मंगाने (तिघेही रा.सिंहगड रोड,पुणे) व जोतीबा महादेव काटकर (रा.हडपसर, पुणे) असे अकरा जणांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

स्वप्नील संजय वणवे (वय-27, रा. विठ्ठलवाडी, 15 नंबर, हडपसर, ता. हवेली, जि. पुणे), सिद्धार्थ सदाशिव कांबळे, सुरेश रोहिदास चव्हाण, सुरेश माथा शिंदे, प्रदीप शहाजी गायकवाड, राहुल बाळासो भोंगळे, प्रमोद लीलाधर बोरकर, संदीप बबन जमदाडे, तुषार शिवाजी शिंदे, पुष्पराज रामविलास गुप्ता, माऊली रामदास बंडगर, अविनाश शिवाजी ढवळे, शाकीर रज्जाक शेख, सुशांत सुरेश भुजबळ शकील रज्जाक शेख बाबासाहेब बाळासाहेब काळभोर, तानाजी मानसिंग काळभोर व दत्ता माणिक अंबुरे (तिघेही रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे फसवणूक झालेल्या 19 गुंतवणूकदारांची नावे आहेत.

19 गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, प्रशांत गवळी व त्याच्या 10 सहकाऱ्यांनी शेतीमाल एक्सपोर्ट व शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविल्यास प्रतिमाह 5 ते 10 टक्के परतावा देण्याच्या आमिष दाखविले होते. तसेच त्यांनी सांगितले, आम्ही स्वामी भक्त आहोत व ऑफिसमधील स्वामींची मूर्ती दाखवून शपथ घेतो. आम्ही खोटे धंदे करीत नाही, मी सकाळच्या बैठकीमध्ये प्रार्थना करणारा भक्त आहे, आशा प्रकारे अध्यात्मीक, भावनीक साद घातली. जास्तीत जास्त लोकांनी गुंतवणूक करावी व कंपनीचा व्यवसाय वाढावा. तसेच आधिकचे जर गुंतवणूकदार जोडले तर रॅक अॅण्ड रिवार्ड, ज्यादाचा परतावा, महागड्या गाडया व विदेशी यात्रा आशा प्रकारची प्रलोभने देऊन विश्वास संपादन केला. या विश्वासाला बळी पडून गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले आहेत.

समर्थ कॉप केअर कंपनी व शेअर मार्केटमधून नफा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांकडून कोट्यावधी रुपयांची रक्कम गोळा केली आहे. जुलै, 2025 पासून मूळ मुद्दल व परतावा देणे बंद केले आहे. तसेच गुंतवणूकदारांची मूळ मुद्दल देण्यासाठी कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे. कंपनीने सर्व विथड्रॉवल रिक्वेस्ट पोर्टलवरुन अचानक रद्द केल्या, कोणतीही पूर्वसूचना अथवा स्पष्टीकरण न देता हे सरळ सरळ अपहार व फसवणुकीच्या हेतूने हे कृत्य केले आहे. कंपनीने गुंतवणूक विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करुन घेतली असून, त्याचा वापर निधी अपहार व मनी लॉडरिंगसाठी केला असल्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, प्रशांत गवळी यांनी स्वतःला कृषी आयुक्त आशी बोगस व बेकायदेशिर पदवी फलक ऑफिसवर लावला होता. त्यामुळे त्यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. समर्थ कॉप केअर कंपनीचा भांडाफोड झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूकदार व फसवणुकीचा आकडा मोठा वाढण्याची दाट शक्यता आहे.

जमिनीची विक्रीचे पुरावे पुणे प्राईम न्यूजच्या हाती

एकीकडे आपल्या अडचणी व व्यथा मांडणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रशांत गवळी यांच्याकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. गुंतवणूकदारांच्या कुटुंबातील सदस्य रुग्णालयात अखेरची घटका मोजत आहेत. तर काही गुंतवणूकदार आपली आयुष्याची जमापुंजी जाणार या भीतीने आजारी पडले असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे प्रशांत गवळी याने त्याच्या नावावर असलेली जमीन 1 कोटी 63 लाख रुपयांना मागील एक महिन्यापूर्वी विक्री केली आहे. या जमीन विक्रीचे पुरावे पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागले आहे. परंतु, गवळी याच्याकडे करोडो रुपये असताना देखील गुंतवणूकदारांना एक दमडीही दिलेली नाही. यावरून आपल्याला दिसून येते की, प्रशांत गवळी यांना गुंतवणूकदारांचे काहीही गांभीर्य नसल्याचे दिसून येत असून तो केवळ आव आणण्याच्या प्रयत्न करत आहेत.

पोलिसांच्या कारवाईवर गुंतवणूकदारांचे भवितव्य अवलंबून

प्रशांत गवळी याने वारंवार ऑफलाईन सेमीनार, झुम मिटींग, गुगल मिट, ग्रुप मिटींग घेवून कंपनीच्या ब्रोकींग हाऊसच्या मध्यमातून कंपनीचे डिमॅट, इन्शुरन्स, बँकिंग, म्युचल फंड, ए.आय.एफ. अंतिम देह नमूद यामध्ये पैसे गुंतवण्यास सांगून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली आहे. परंतु, प्रशांत गवळी व त्याचे सहकारी आता कोणाच्याही संपर्कात नसून, गुंतवणूकदारांना कोणताही परतावा मिळत नाही. तो पळून गेल्याची दाट शक्यता आहे. म्हणून गुंतवणूकदरांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. पोलीस प्रशासनाचे चौकशी सुरु केली आहे. पोलिसांच्या कारवाईवर गुंतवणूकदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

पुणे प्राईम न्यूजला धमक्यांचे फोन

मागील चार महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूजने वारंवार बातम्या प्रसिद्ध करून जनजागृती केली आहे. गुंतवणूकदारांची भविष्यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी वारंवार आवाज उठविला आहे. खरी हकीकत मांडल्यामुळे ‘समर्थ क्रॉप केअर’ या बोगस कंपनीचा भांडाफोड झाला. अनेक गुंतवणूकदारांनी पुणे प्राईम न्यूजवर विश्वास ठेवल्याने त्यांची फसवणूक टाळली आहे. परंतु, आपली संस्था दिवाळखोरीत गेल्याचा राग मनात धरून प्रशांत गवळी, त्याचे संचालकांसह एजंट लोकांकडून पुणे प्राईम न्यूजचे संपादक व पत्रकारांना फोन व एसएमएसद्वारे धमक्या येत आहेत. याबाबत पुणे प्राईम न्यूजचे शिष्ठ मंडळ उद्या सोमवारी (ता.15) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार करणार आहे.

अधिक माहितीसाठी पाहा व्हिडीओ:

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Pune News

Pune News : पुण्यात पुरुषांच्या नसबंदीचा विक्रम! कुटुंब कल्याण कार्यक्रमात पुणे महापालिका राज्यात अव्वल स्थानावर; पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.