Pune News: पुणे : येरवडा परिसरात एका पोलीस शिपाईच्या कामगिरीची चौहीकडे कौतुक होत आहे. काल सांयकाळी रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती जीवन मरणाची झुंज देत असताना पोलीस (Pune Police) शिपाईने मोठ्या धाडसाने त्या व्यक्तीचे जीव वाचवले. Pune News

हेही वाचा- पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल; शहराच्या सुरक्षेसाठी ५ नवीन पोलीस चौकी, गुन्हेगारीला लगाम बसणार?
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सांवत (47) गोल्फ क्लब चौकाजवळील बसस्थानकाजवळ उभा होता. त्यावेळी अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना झाल्या आणि तो खाली कोसळला. काही क्षणातच त्याचा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आजूबाजूला असलेले नागरिक परिस्थितीकडे बघत होते, परंतु मदतीसाठी पुढे येण्याचे धाडस कुणी केले नाही. याच दरम्यान तिथून जात असलेल्या पोलीस मुख्यालयातील शिपाई सुशांत रणवरे यांच्या नजरेस हा प्रकार पडला. क्षणाचा विलंब न करता त्यांनी वाहन थांबवले आणि गर्दीतून मार्ग काढत ते थेट सावंत यांच्या जवळ धावले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने CPR (Cardiopulmonary Resuscitation) देण्यास सुरुवात केली.
योग्यवेळीस दिलेल्या सीपीआरमुळे त्यांनी काही सेंकदात प्रतिसाद देण्यास सुरु केला. मृत्यूच्या दारात उभे असलेले संदीप सांवत यांचा जीव वाचला. या घटनेनंतर परिसरात पोलीस शिपाई यांचे कौतुक होऊ लागले. रणवरे यांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे कौतुक होत आहे.






