पुणे: इंस्टाग्रामवर ओळख करून (Pune Crime) मैत्री वाढवण्याच्या (Pune News) नावाखाली फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीने भेटीचे आमिष दाखवून एका तरुणाला सापळ्यात अडकवत त्याच्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका तरुणीसह 4 ते 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking News)

भेटण्यासाठी कात्रज परिसरात बोलावले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, इंस्टाग्रामवर “रसिका” (नाव बदलले आहे) नावाच्या तरुणीशी त्याची ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये सामान्य चॅटिंग सुरू झाले होते. मात्र काही दिवसांतच त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली आणि रोज संवाद होऊ लागला. या जवळिकीचा फायदा घेत एके दिवशी रसिकाने त्या तरुणाला भेटण्यासाठी कात्रज परिसरात बोलावले. (Latest Marathi News)
फिरायला जाऊया असा आग्रह
भेटीच्या आमिषाने तरुण आपल्या दुचाकीवर कात्रज येथे गेला. दोघांची भेट झाल्यानंतर काही वेळातच रसिकाने कात्रज घाटात फिरायला जाऊया असा आग्रह धरला. घाटाच्या दिशेने जात असताना एका ठिकाणी तिने अचानक गाडी थांबवण्यास सांगितले. गाडी थांबताच आधीपासून दबा धरून बसलेले रसिकाचे काही साथीदार तिथे आले. (Marathi Batmya)
हेही वाचा: बनावट कागदांवर काढून दिले ओरिजिनल पिस्तूल परवाने; नीलेश घायवळ टोळीला शस्त्र पुरवणाऱ्या एजंटला अटक
गुन्हा दाखल करण्याची धमकी
या सर्वांनी तरुणाला धमकावत जबरदस्तीने येवलेवाडी परिसरात नेले. तेथे त्याला मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली आणि त्याच्यावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. या भीतीखाली आरोपींनी त्याच्याकडून 70 हजार रुपये मागितले. मात्र तरुणाकडे एवढी रक्कम नसल्याने आरोपींनी त्याच्याकडील 10 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. उर्वरित पैशांसाठी त्याला सतत फोन करून धमकावण्यास सुरुवात केली.
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत रसिका आणि तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात करत आहेत.







