पुणे : व्यावसायिक शिव शर्मा मृत्यू प्रकरणात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. 9 ऑक्टोबरच्या रात्री हजरतगंज येथील अवध ग्रीन अपार्टमेंटमध्ये शिवावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा पोलिसांकडून खुलासा झाला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी श्रद्धा, तिची बहीण रश्मी आणि ड्रायव्हर दानिश यांना पोलिसांनी अटक केली असून, चौकशीत धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.

पोलिसांच्या चौकशीत असे स्पष्ट झाले की, श्रद्धाला शिवाकडून पैसे उकळायचे होते. यासाठी तिने 9 ऑक्टोबरच्या रात्री शिवाला फ्लॅटवर बोलावून ब्लॅकमेल केले. श्रद्धाकडे शिवाचे काही खाजगी आणि आक्षेपार्ह फोटो होते, ज्यांच्या आधारे ती त्याला सतत धमकी देत होती. घटनेच्या रात्री श्रद्धा आणि तिच्या साथीदारांनी शिवाचे कपडे काढून त्याला मारहाण केली, त्याच्या शरीरावर लिपस्टिक लावली आणि सर्वांसमोर नग्न नाचायला भाग पाडले. इतकेच नाही तर त्याला सिगारेटने चटके देऊन प्रचंड त्रास देण्यात आला आणि अपमानित केले गेले.
या भयानक कृत्यात श्रद्धा आणि तिच्या बहिणीसह ड्रायव्हर दानिश, मोलकरीण आणि श्रद्धाचा जवळचा मित्र आमिर देखील सहभागी असल्याचे तपासात समोर आले. सुरुवातीला आरोपींनी आमिरबद्दल लपवाछपवी केली होती, परंतु पोलिसांच्या कसून चौकशीनंतर संपूर्ण कट बाहेर आला. पैशांसाठी एका माणसावर झालेला हा टोकाचा मानसिक आणि शारीरिक छळ पोलीस यंत्रणेलाही थक्क करणारा ठरला आहे.







