बीड: मस्साजोग येथील सरपंच (Manoj Jarange Patil) दिवंगत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर (Massajog News) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Beed News) यांनी मस्साजोग येथे भेट देत देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली आणि सरकारवर गंभीर आरोप केले. या प्रकरणात निकाल येण्यासाठी अनेक वर्षे लागणार नाहीत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते. 1 वर्षाच्या आत आरोपींना फासावर लटकवू, असे शब्द देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या प्रकरणात दिरंगाई होत असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. (Breaking News)

धनंजय मुंडेंवर साधला निशाणा (Dhananjay Munde)
नाव न घेता त्यांनी अजित पवार गटातील बीडमधील आमदार धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. सरकार पक्षातीलच एक आमदार या प्रकरणात अडथळे निर्माण करत असून संपूर्ण यंत्रणा त्याच्या हातात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे प्रकरण मुद्दाम भिजत-गोंधळ ठेवले जात आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. (Dhananjay Munde)
न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही (Manoj Jarange)
संतोष देशमुख प्रकरणात आम्ही सर्व एकत्र असून पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. एका मुलीला आणि एका मुलाला आपला वडील दिसणार नाहीत, ही वेदना असह्य आहे. आरोपींना तातडीने फाशी झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. परळी परिसरातून मुद्दाम काही लोकांकडून आरोपी सुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. (Marathi Batmya)
ज्या दिवशी आरोपी सुटेल, त्या दिवशी…
यापैकी एक आरोपी सुटल्यास त्या दिवशी संपूर्ण जिल्हा बंद ठेवला जाईल आणि नंतर राज्य बंद करण्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. सरकारने परळीतील काही नेते अशा प्रकारची विधाने का करत आहेत, याचा शोध घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. कृष्णा आंधळे अजूनही सापडलेला नाही, हा मोठा प्रश्न असून इतक्या क्रूर हत्येतील आरोपी मोकळे फिरत आहेत, यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. फडणवीस यांनी दिलेल्या शब्दावर लोक शांत बसले होते, पण आता तपासाचा वेग कमी झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. (Marathi News)
तीव्र आंदोलनाचा इशारा
पोलीस महासंचालक आणि राजकीय नेत्यांच्या बैठकांवरही त्यांनी संशय व्यक्त केला. विकासाच्या कामांमध्ये पोलीस महासंचालकांची बैठक कशासाठी, काहीतरी शिजत असल्याची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला. (Maharashtra News)







