Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मालमत्ता खरेदी-विक्रीच्या नियमांत मोठा बदल! आता दस्त कोणी तयार केला, हे लपवता येणार नाही; नाव, पत्ता अन् स्वाक्षरी बंधनकारक..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 November 2026, 20:00

पुणे: राज्यभरातील मालमत्ता खरेदी-विक्रीच्या दस्त नोंदणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापुढे नोंदणीसाठी सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक दस्तावर तो दस्त नेमका कोणी तयार केला आहे, याची संपूर्ण माहिती आणि स्वाक्षरी नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. या संदर्भातील नवीन परिपत्रकाचा मसुदा मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

बऱ्याचदा फसवणूक करणारे लोक बनावट कागदपत्रे किंवा खोट्या व्यक्ती उभ्या करून दस्तांची नोंदणी करून घेतात. अशा प्रकरणांमध्ये पोलीस तपासादरम्यान थेट नोंदणी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच आरोपी केले जाते. वास्तविक पाहता, नोंदणी कायद्यानुसार कागदपत्रांची सखोल सत्यता तपासणे किंवा मालकी हक्काची चौकशी करणे हे नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येत नाही. तसेच विभागाकडे कागदपत्रे तपासणारी स्वतंत्र यंत्रणाही उपलब्ध नाही.

आजवर अशा गुन्ह्यांमध्ये नोंदणी अधिनियम 1908 च्या कलम 82 व 83 नुसार केवळ पक्षकारांवरच कारवाई होत असे. परंतु, ज्या व्यक्तीने कागदपत्रांची छाननी करून दस्त तयार केला, तिचा तपशील रेकॉर्डवर नसल्याने तिला मोकळे रान मिळत होते. ही त्रुटी दूर करण्यासाठी आता दस्त तयार करणाऱ्या व्यक्तीला दस्ताच्या शेवटी “सदर दस्त मी तयार केला आहे (Drafted and Prepared by Me)” असा स्पष्ट शेरा लिहावा लागेल. यासोबतच स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता, दिनांक आणि स्वाक्षरी करणे आवश्यक असेल. शिवाय, त्या व्यक्तीचे स्वसाक्षांकित ओळखपत्रही दस्तासोबत जोडावे लागणार आहे.

या नवीन नियमांमुळे फसवणुकीच्या प्रकरणांत दस्त तयार करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित होण्यास मदत होईल. मात्र, केवळ दस्त तयार करणाऱ्याची माहिती दिलेली नाही या एकाच कारणावरून कोणताही कायदेशीर दस्त नाकारला जाणार नाही, असेही या मसुद्यात स्पष्ट केले आहे. तसेच, अनधिकृत व्यक्तींचा नोंदणी कार्यालयातील हस्तक्षेप थांबवण्याचे निर्देशही सर्व दुय्यम निबंधकांना देण्यात आले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मालमत्ता खरेदी-विक्रीच्या नियमांत मोठा बदल! आता दस्त कोणी तयार केला, हे लपवता येणार नाही; नाव, पत्ता अन् स्वाक्षरी बंधनकारक..

Tuesday, 24 November 2026, 20:00

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! ‘स्वर्गीय अजितदादा’ उल्लेखाला पूर्णविराम; मुख्यमंत्र्यांकडे 3 महत्त्वाच्या मागण्या..

Tuesday, 24 November 2026, 19:30

शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार? सुप्रिया सुळेंचा संताप; म्हणाल्या, “कोणी निवृत्त व्हायचं हे…”

Tuesday, 24 November 2026, 18:33

जरांगेंविरोधात बारस्करांचा मोठा डाव! पुराव्यांचा पेनड्राईव्ह थेट पोलिसांच्या हाती; मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार?

Tuesday, 24 November 2026, 17:56

रागाच्या भरात आधी भितींवर डोकं आपटलं मग हाल-हाल करून मारलं; पुण्यातल्या इंजिनिअर तरुणीच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा

Tuesday, 24 November 2026, 17:52

“मी घर सोडून चाललो” आईला मेसेज करून पुण्यातील १६ वर्षीय विद्यार्थी गायब! पोलिसांची शोधाशोध, पण मित्रांच्या मदतीने असं काही घडलं की…

Tuesday, 24 November 2026, 17:41
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp