Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समीक्षाच्या बरगड्यांमध्ये चाकू खोलवर अडकला; संपूर्ण घरात रक्ताचा सडा, आरोपीची गळफास घेत आत्महत्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 5 June 2025, 16:09

कोल्हापूर: कोल्हापूरसारख्या पुरोगामी आणि सांस्कृतिक वैभव लाभलेल्या शहरात घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरुणीची हत्या करून तिच्या प्रियकराने आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना आहे. ही घटना राज्यभर खळबळ उडवणारी ठरत आहे.

सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय २३) हे गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. परंतु अलीकडच्या काही महिन्यांत त्यांच्यात सतत वाद होऊ लागले. सतीश यादव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे समीक्षा त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हती. त्यामुळे सतीश सातत्याने तिला लग्नासाठी मानसिक त्रास देत होता. अखेर मंगळवारी सकाळी दोघांमध्ये वादाच्या पार्श्वभूमीवर सतीशने अत्यंत अमानुषपणे चाकूने छातीत वार करून समीक्षेचा खून केला.

समीक्षा ही सरनोबतवाडी येथील एका भाड्याच्या घरात तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती. त्या दोघी मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होत्या. याच दरम्यान ती काही दिवसांसाठी आपल्या आईकडे बावड्यात राहत होती. मंगळवारी ती आपल्या मैत्रिणीसोबत सामान आणण्यासाठी सरनोबतवाडीतील भाड्याच्या घरी गेली होती. त्यावेळी तिने सतीशला फोन केला. समीक्षा तेथे पोहोचल्याची माहिती मिळताच सतीश देखील तेथे १५ मिनिटांत पोहोचला. यानंतर पुन्हा एकदा लग्नाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. मैत्रीण वाद शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच संतापलेल्या सतीशने अचानक खिशातून चाकू काढून थेट समीक्षाच्या छातीत खोलवर खुपसला. चाकू इतका खोल गेला होता की तो थेट बरगड्यांपर्यंत घुसला आणि बाहेर निघेचना. त्यानंतरही सतीशने तिला लाथांनी मारहाण केली आणि घराचा दरवाजा बंद करून घटनास्थळावरून फरार झाला. समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली होती. तिच्या मैत्रिणीने तात्काळ मदत मागवत मित्रांना बोलावून घेतले आणि तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच समीक्षाने प्राण सोडले.

समीक्षा आणि तिची मैत्रीण ज्या घरात राहत होत्या, ते घर एका पोलिस कर्मचाऱ्याचे होते. त्यामुळे या घटनेनंतर पोलिस खात्यातही खळबळ उडाली आहे. हॉलपासून ते किचनपर्यंत सगळीकडे रक्ताचे डाग पसरलेले होते. सतीश यादव याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आधीपासून पोलिसांना ठाव होता. तो शिवाजी पेठेतील एका क्लबचा चालक होता. समीक्षा त्याला अनेकदा दुसरे काम करण्याचा सल्ला देत होती, मात्र तो तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत होता.

 

समीक्षाचे वडील सात वर्षांपूर्वी निधन पावले होते. तिचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते, परंतु कौटुंबिक वादामुळे ती पतीपासून विभक्त राहत होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे सतीशसोबत लग्न करणे तिने नाकारले होते. तिची आई मासे विक्रीचा व्यवसाय करत असून समीक्षा देखील इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून कुटुंबाला आधार देत होती. तिच्या मृत्यूमुळे आई आणि भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खून केल्यानंतर फरार झालेल्या सतीश यादव याने गुरुवारी सकाळी पन्हाळा तालुक्यातील माळापुरे कातळापुडी येथे एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला असून त्याला पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर सुरू केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21
Next Post

पाच लाख रुपयांचा तगादा, विवाहितेचा शारीरिक छळ अन् पतीने केलं दुसरं लग्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp