Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“बालगुन्हेगारांचे वय 18 वरून 16? महाराष्ट्र सरकारचा केंद्राकडे मोठा प्रस्ताव!”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 July 2026, 11:13

पुणे : महाराष्ट्रात सध्या बालगुन्हेगारीचे प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. या गंभीर समस्येला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. बाल गुन्हेगारांचे वय सध्या कायद्यानुसार 18 वर्षे मानले जाते, मात्र हे वय कमी करून 16 वर्षे करण्यात यावे, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारी विश्वातील एक धक्कादायक प्रकार समोर आणला. सध्याच्या कायद्यानुसार लहान मुलांना थेट अटक करता येत नाही, तर त्यांना बालगृहात ठेवले जाते. याच नियमाचा गैरफायदा काही गुन्हेगारी टोळ्या घेत आहेत. 16 वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या मुलांचा वापर करून ही मोठी रॅकेट्स गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा लहान मुलांना गुन्हेगारीच्या गर्तेत ढकलणाऱ्या टोळ्यांवर आता थेट ‘मकोका’ अंतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

जालना जिल्ह्यात लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते.या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी राज्य सरकार एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करणार आहे. ही समिती वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयाचा अभ्यास करेल आणि अशा टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी कायदेशीर पर्याय शोधेल.

 

याच वेळी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नवीन पद्धतीचा पर्दाफाश केला. ही टोळी व्यापाऱ्यांना केवळ खंडणीसाठी धमकावत नाही, तर दहशत निर्माण करण्यासाठी भाडोत्री गुंडांकरवी थेट त्यांच्या घरांवर किंवा कार्यालयांवर गोळीबार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रक्षक की भक्षक? टॅक्सी चालकाला भर चौकात धक्काबुक्की; पोलिसांच्या ‘सिंघमगिरी’वर प्रश्नचिन्ह

Wednesday, 1 July 2026, 18:44

लोणी काळभोर ग्रामपंचायतीत ‘सेतू सुविधा केंद्र’ सुरू; शासनाचे दाखले आता गावातच, नागरिकांची धावपळ थांबणार

Wednesday, 1 July 2026, 18:21

वाहतूक कोंडीवर ‘डबल डेकर’ उपाय! कोथरूडमध्ये मेट्रोसोबतच लांबलचक उड्डाणपुलाची उभारणी होणार

Wednesday, 1 July 2026, 17:51

केतन अग्रवाल प्रकरणाची खिल्ली उडवणं पडलं महागात! डॉक्टर महिलेवर थेट कारवाई….

Wednesday, 1 July 2026, 17:41

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत नियमावली! ‘या’ तारखेदरम्यान आळंदीतील मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांना बंदी…

Wednesday, 1 July 2026, 17:05

पेरणे फाट्यावर पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला; तिघांवर लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल..

Wednesday, 1 July 2026, 16:39
Next Post

कुरकुंभ एमआयडीसीत रासायनिक पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक; दौंड पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.