Indurikar Maharaj : पुण्यात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काळेपडळ परिसरात शुक्रवारी रात्री त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. मोठ्या संख्येने भाविक आल्यामुळे परिसरात अचानक प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आणि काही वेळातच मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आयोजकांकडे नाराजी व्यक्त केली. याच वेळी वाहतूक पोलिस आणि इंदुरीकर महाराज यांच्यात शाब्दिक वाद झाला. दोन्ही बाजूंनी जोरात बोलणं झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, कीर्तनाच्या कार्यक्रमात वाहतूक नियोजनाअभावी निर्माण झालेल्या गोंधळाची शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे.






