Dhurandhar Movie: अभिनेता रणवीर सिंग यांचा चित्रपट ‘धुरंधर’ने सद्या चांगलीच कमाई करत आहे. अवघ्या आठवड्याभरातच 200 कोटीहून जास्त कमाई केली. दरम्यान पाकिस्तानातील कराची शहरातील एका न्यायालयात भारतीय चित्रपट ‘धुरंधर’ विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत असा आरोप आहे की चित्रपटात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचे फोटो, पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चा झेंडा आणि पक्षाच्या रॅलींचे दृश्ये कोणतीही परवानगी न घेता दाखवण्यात आली आहेत.

हेही वाचा- वनविभागाची मोठी कामगिरी, बेट भागात २६ बिबटे पकडण्यात आलं यश
याचिकेत असा देखील आरोप आहे की चित्रपटात PPP ला दहशतवादाला पाठिंबा देणारी पार्टी म्हणून दाखवण्यात आले आहे. ही याचिका PPP कार्यकर्ते मोहम्मद आमिर यांनी कराचीच्या डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्ट (साउथ) मध्ये दाखल केली आहे.
याचिकेत चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता, कलाकार आणि चित्रपटाच्या निर्मिती व प्रचाराशी संबंधित सर्व व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रमुख अभिनेत्यांमध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेनी यांचा समावेश आहे. तसेच दिग्दर्शक आदित्य धर, निर्माता लोकेश धर आणि ज्योती किशोर देशपांडे यांचेही नाव याचिकेत आहे.
याचिकाकर्त्याने म्हटले आहे की चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ट्रेलरमध्ये माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचे फोटो आणि PPP शी संबंधित दृश्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता दाखवण्यात आली आहे. पण यामुळे पाकिस्तान देशाची प्रतिमा खराब होत आहे. तसेच कराचीतील लियारी परिसराला ‘दहशतवाद्यांचे युद्ध क्षेत्र’ म्हणून दाखवण्यात आले असून हे चित्रण अपमानास्पद आणि दिशाभूल करणारे असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.
सोशल मीडियावर चित्रपटाची गाणी व्हायरल
दरम्यान, रणवीर सिंग यांचा ‘धुरंधर’ चित्रपट सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. भारतासह काही देशांमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळला आहे. पण मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये या चित्रपटाला प्रदर्शित करण्यास परवानगी नाही. सेन्सॉर मंडळांनी चित्रपट ‘पाकिस्तानविरोधी’ असल्याचा दावा करत तो नाकारला आहे.






