Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Farmers Loan Waiving: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबाबत धक्कादायक आकडेवारी उघड; विधानसभेत मंत्र्यांनीच दिली माहिती 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 11 December 2025, 16:03
Farmers Loan Waiver: Shocking statistics regarding the Chhatrapati Shivaji Maharaj Farmers' Honour Scheme revealed; the information was provided by the minister himself in the Legislative Assembly.

नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत पात्र ठरलेले तब्बल 6 लाख 56 हजार शेतकरी आठ वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचे सरकारनेच मान्य केले आहे. विधानसभेत तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Cooperation Minister Babasaheb Patil) यांनी ही गंभीर माहिती सादर केली. (Farmers Loan Waiving)

 

फक्त 500 कोटींची तरतूद

या प्रलंबित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी 5,975.51 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र पुरवणी मागण्यांमध्ये केवळ 500 कोटींची तरतूद करण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “शेतकऱ्यांची थट्टा केली जाते आहे काय?” असा सवाल ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने पात्र शेतकऱ्यांना तत्काळ लाभ देण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही, अशी स्थिती सरकारने दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीत एक अब्ज जमा, पण…

दरम्यान, मुख्यमंत्री सहायता निधीविषयीची माहितीही समोर आली आहे.  ऑक्टोबर महिन्यात निधीत एक अब्ज रुपये जमा झाले, मात्र अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75 हजार रुपये मदत देण्यात आल्याचे समोर आले आहे.

साखर कारखान्यांकडून प्रति टन ऊसामागे 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. या निर्णयावर वाद झाले असतानाही त्याचे लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे दिसून येत आहे.

 5.42 लाख शेतकऱ्यांची मदत रोखली

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 31,628 कोटींच्या मदत पॅकेजची अंमलबजावणीदेखील तांत्रिक अडथळ्यांमुळे खोळंबली आहे. पोर्टलवरील त्रुटी, ई-केवायसी अपूर्ण असणे, बँक-आधार तफावत यांमुळे 5,42,141 शेतकऱ्यांना जाहीर मदत मिळालेली नाही. या लाभार्थ्यांच्या नावावरची 355.55 कोटी रुपयांची रक्कम अद्याप वितरित न झाल्याचे अधिकृत आकडेवारीतून उघड झाले आहे.

सरकारच्या विविध योजना, निधी तरतूद आणि त्यांच्या अंमलबजावणीतील मोठ्या तफावतीमुळे शेतकऱ्यांतील नाराजी वाढत असून, कर्जमाफी आणि मदत योजना कागदावरच अडकून पडल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Pune Accident: Brake failure of PMP bus at Wagholi bus stand; Hit by heavy sugarcane tractor

Pune Accident: वाघोलीत बसथांब्यावरच पीएमपी बसचा ब्रेक फेल; उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.