लुधियाना: पंजाबच्या लुधियाना (Crime News) शहरात एक धक्कादायक घटना समोर आली (Viral News) असून, एका हॉटेलमध्ये विवाहित महिलेचा मृतदेह (Trending News) आढळल्याने परिसरात (Breaking News) खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिलेच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचा प्राथमिक तपासातून निष्कर्ष काढण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. (Marathi News)

खाजगी क्षण एकत्र घालवले
मृत महिलेचे नाव रेखा असून, आरोपी प्रियकराचे नाव अमित निषाद आहे. रेखा आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. तिला दोन मुले असून, ती काही काळापासून अमितसोबत प्रेमसंबंधात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रेखा आणि अमित लुधियानातील हॉटेल इंडो-अमेरिकनमध्ये गेले होते. दोघांनी तिथे एक खोली घेतली आणि काही वेळ एकत्र घालवला. (Latest Marathi News)
लग्न करण्याचा दबाव
हॉटेलच्या खोलीत दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. त्यानंतर रेखाने अमितवर लग्न करण्यासाठी दबाव टाकला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाच्या वेळी रेखाने कटरच्या सहाय्याने अमितच्या गुप्तांगावर वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे अमित प्रचंड संतापला आणि त्याने रेखाचा गळा दाबून तिची हत्या केली.
तिचा अर्धनग्न मृतदेह
हत्या केल्यानंतर अमित हॉटेलमधून फरार झाला. काही वेळाने हॉटेल मॅनेजरने खोली तपासली असता रेखाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला.
तांत्रिक माहितीच्या आधारे शोध
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी अमित निषाद याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. गुप्तांगावर गंभीर जखम झाल्यामुळे त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात हत्या आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.







