Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

त्यांनी मला खोलीत यायला सांगितलं..! वादग्रस्त पूजा खेडकर यांचे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर गंभीर आरोप..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 31 July 2024, 16:04

नवी दिल्ली : गेले काही दिव्सझाले राज्यात आणि एकूणच देशात सुद्धा वादग्रस्त पूजा खेडकर या प्रकरणाची चर्चा रंगत आहे. या प्रकरणाबाबत बुधवारी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गंभीर आरोप झाले होते. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीची फसवणूक करुन पूजा खेडकर अधिकारी झाल्याचे बोलले जात होते.  यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.

 

मात्र, पूजा खेडकर या फरार आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली आहे. सुनावणी वेळी पूजा खेडकर यांचे वकील ॲड. माधवन यांनी एक गंभीर आरोप केला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचे ॲडव्होकेट माधवन यांनी बाजू मांडताना म्हटले आहे.

ॲड. माधवन यांनी न्यायालयात पूजा खेडकरची बाजू मांडताना म्हटले की, याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे. युपीएससीकडून दररोज पत्रकारपरिषद घेतली जात आहे परंतु पूजा खेडकर कधीच प्रसारमाध्यमांसमोर गेल्या नाहीत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सांगण्यावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. सुहास दिवसे यांच्याविरुद्ध पूजाने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. सुहास दिवसे यांनी पूजाला त्यांच्या खोलीत यायला सांगितल होते. मात्र, पूजाने त्यांना नकार दिला, असा दावा खेडकर यांचे वकील ॲड. माधवन यांनी केला आहे.

कोर्टात काय घडलं?

ॲडव्होकेट माधवन यांनी न्यायालयात पूजा खेडकर यांची भक्कमपणे बाजू मांडताना अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी पूजा खेडकरची बाजू मांडताना म्हटले की, पूजा खेडकर हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आता ते म्हणत आहेत की, माझी पोलीस कोठडीत चौकशी झाली पाहिजे. पण मी काय केलं आहे? सरकारी यंत्रणांनी माझ्यावर गुन्हा दाखल करताना इतकी तत्परता का दाखवली. मला माझ्या बचावाची बाजू मांडण्यासाठी पूर्ण संधी मिळाली पाहिजे, असे पूजा खेडकरने म्हटले.

मात्र, माझ्यावर गुन्हेगारी खटला दाखल केल्याने आणि मला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने मी माझा बचाव करण्यास असमर्थ आहे. त्यासाठी मला अटकपूर्व जामिनाची गरज आहे. मला अटक करण्यास स्थगिती दिल्यास मला बचावाची संधी मिळेल, असे पूजा खेडकरने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले आहे. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल होताच प्रसारमाध्यमांनी माझ्याविरोधात मोहीम सुरु केली. मी प्रसारमाध्यमांशी बोलायला कधीच गेले नव्हते. कारण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असेही पूजा खेडकरने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले.

फ्रॉड नाही तर फायटर..

ॲडव्होकेट माधवन न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले कि, पूजा खेडकर या फ्रॉड नसून फायटर आहेत. दरवेळी तिला परीक्षार्थी होण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. ती दिव्यांग आहे. तिचे आईवडील घटस्फोटित आहेत. ती महिला आहे. तिच्यावर गुन्हा का दाखल केला गेला. कारण ती दिव्यांग आहे म्हणून की ती महिला आहे म्हणून?, असे प्रश्न ॲडव्होकेट माधवन यांनी न्यायालयासमोर उपस्थित केले आहेत.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

मावडी सुपे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सविता बहिरट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.