राहुलकुमार अवचट

यवत : गावच्या हद्दीतील कासाबाईची वस्ती येथे 17 तारखेला संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. या भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी यवत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदवल्या आहेत. या संपूर्ण घटनेत एकूण 31 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जमिनीची मोजणी सुरू असताना किंवा ती पूर्ण झाल्यानंतर या वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. एका घटनेत मोजणी आटोपून संपत दोरगे, अमित शंकर दोरगे, निखील दिलीप दोरगे आणि संदीप विजय दोरगे हे घरी परतत असताना त्यांना शेताजवळ अडवण्यात आले. “तुम्ही कोणाच्या परवानगीने जमीन मोजताय, ही काय तुमच्या बापाची जमीन आहे का?” असा सवाल करत त्यांना शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्या. या वेळी हात, लाथाबुक्के आणि दगडांनी मारहाण करून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संपत बळीबा दोरगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदानंद वामनराव दोरगे, शहाजी वामन दोरगे, मालन सदाशिव दोरगे, उषा शहाजी दोरगे, दादा गणपत माने, पमाबाई गणपत माने, बाळासाहेब दगडू महाडीक, अमोल बाळासाहेब महाडीक, संदीप सुरेश जवळकर, सचिन सुरेश जवळकर, स्वप्नील शहाजी दोरगे, सनी सदानंद दोरगे, सागर शहाजी दोरगे आणि वेदांत विकास माने यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुसऱ्या तक्रारीत विकास गणपत माने यांनी वेगळी बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही जण घरी आले आणि आईला उद्देशून अपशब्द वापरत धमकावले. “मोजणी कशी करता तेच पाहतो,” असे म्हणत खाली पाडून हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या तक्रारीत बाजीराव दिनकर दोरगे, शंकर दिनकर दोरगे, यशवंत दत्तात्रय दोरगे, वैभव यशवंत दोरगे, अमित शंकर दोरगे, आशिष शंकर दोरगे, खंडू बाजीराव दोरगे, विजय किसन दोरगे, दिलीप किसन दोरगे, संदीप विजय दोरगे, निखील दिलीप दोरगे, नवनाथ संपत दोरगे, गणेश संपत दोरगे, अनिकेत यशवंत दोरगे, ओंकार खंडू दोरगे आणि संपत बळवंत दोरगे यांचा समावेश आहे. कासाबाईची वस्ती येथील सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असून, पोलीस हवालदार हाडागळे पुढील तपास करत आहेत.






