Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सनदी लेखापालांनी आर्थिक विनियोगाचा मार्ग दाखवावा; स्वामी गोविंददेव गिरी यांचे प्रतिपादन…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 3 December 2022, 17:37

पुणे : “सनदी लेखापाल हा समाजाचा आर्थिक शिक्षक असतो. धन कमावल्याने जीवनात यश मिळते, मात्र धनाच्या योग्य विनियोगातून जीवनाचे सार्थक होते. त्यामुळे सनदी लेखापालांनी धनाचा विनियोग चांगल्या मार्गाने करण्यासाठी मार्गदर्शन करावे,” असे प्रतिपादन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.

सनदी लेखापाल म्हणून शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात ५० वर्षे पूर्तीबद्दल सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांचा ‘सीए (डॉ.) एस. बी. झावरे गौरव समिती’तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. तुळशीचा हार, ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती, मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते.

बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमावेळी माजी केंद्रीय मंत्री सीए सुरेश प्रभू, माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, सौ. भारती झावरे, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) माजी अध्यक्ष सीए जयदीप शाह, सीए प्रफुल्ल छाजेड, सीए निलेश विकमसी, आप्पासाहेब कदम, गौरव समितीचे उपाध्यक्ष सीएमए डॉ. धनंजय जोशी, केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सचिव सीए यशवंत कासार, खजिनदार सीए अभिषेक धामणे आदी उपस्थित होते.

 

सत्काराला उत्तर देताना सीए डॉ. एस. बी. झावरे म्हणाले, “खेड्यापाड्यातून येणाऱ्या मुला मुलींना सनदी लेखापाल होण्यासाठी मार्गदर्शन करता आले, हे भाग्य आहे. जीवनात परिपूर्ण होण्याचा विचार दिला. त्यातून विद्यार्थी घडले. तीन पिढ्यांना शिकवण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. ‘परफेक्ट’ची सप्तसुत्री अंगीकारावी. तुम्हा सगळ्यांकडून मिळालेले प्रेम, आदर हीच माझ्या जीवनाची शिदोरी आहे.”

सीए सुरेश प्रभू यांनी अध्यक्षीय समारोप करताना डॉ. झावरे यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. झावरे यांच्यामुळे देशाला चारित्र्यवान सनदी लेखापाल मिळाले. तसेच ‘आयसीएआय’च्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दृक्श्राव्य माध्यमातून डॉ. झावरे यांना शुभेच्छा दिल्या.

सीए प्रफुल्ल छाजेड, सीए जयदीप शाह, सीए निलेश विकमसी, आप्पासाहेब कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सीएमए डॉ. धनंजय जोशी यांनी डॉ. झावरे यांच्या शैक्षणिक, तर सीए चंद्रशेखर चितळे यांनी व्यावसायिक कारकिर्दीचा आढावा घेतला. प्रास्ताविक सीए यशवंत कासार, सूत्रसंचालन सीएमए मधुवंती साठे यांनी केले. सीए अभिषेक धामणे यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

नायगाव येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.