Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar Crime: गॅस टँकरमधून हॉटेल व ढाब्यांसाठी बेकायदेशीररित्या गॅस पुरवठा; 17 टन गॅससह 41 लाखांचा ऐवज जप्त, स्थानिक गुन्हे शाखेकडून चौघांना अटक

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 8 December 2025, 18:18

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर, ता. 08 : चाकणहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या एचपी कंपनीच्या गॅस टँकरमधून रस्त्यातच हॉटेल व ढाब्यांसाठी बेकायदेशीररित्या गॅस भरल्या जाणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाह्यवळण रस्त्याजवळ रंगेहात पकडले. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असून मुख्य हॉटेल मालक फरार आहे.

 

हेही वाचा- मराठा साम्राज्य आता राजधानीत धडकणार, मनोज जरांगेंची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

या कारवाईत एकूण 41 लाख 26 हजार 339 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली. त्यामध्ये एचपी कंपनीचा 8 लाख 36 हजार 339 रुपये किमतीचा 17 टन गॅस, 30 लाख रुपये किमतीचा टँकर, 60 हजार रुपये किंमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 20 व्यावसायिक रिकाम्या टाक्या, 22 हजार 500 किंमतीच्या भारत गॅस कंपनीच्या पाच भरलेल्या व्यावसायिक टाक्या, 2 लाख रुपये किमतीचा छोटा टेम्पो तसेच अवैधरित्या गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, आदींचा समावेश आहे.

हॉटेल चालक राजू साबळे (रा. केडगाव, अहिल्यानगर) हा फरार आहे तर त्याच्याकडे काम करणारे कृष्णा मधुकर दहिफळे (वय 30, कोळवाडी, किनगाव, अहमदपूर, लातूर), आदित्य सुनील पवार (वय-21, बीबी लोणार, बुलढाणा), विश्वास त्र्यंबक शिंदे (वय-51, रा. केडगाव, अहिल्यानगर) व जनातूल शेख (वय 19, चापरा, नदिया, पश्चिम बंगाल, सध्या रा. नील हॉटेल, केडगाव) यांचा समावेश आहे. यातील दोघे टँकर चालक आहेत.

पोलीस तपासात आढळले

टँकर गॅस घेऊन चाकणहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. चाकण येथे एचपी गॅस कंपनीचा डेपो आहे. रस्त्यात केडगाव बाह्यवळण रस्त्याजवळ अनुराज टायर विक्रीच्या गोदामात टँकर थांबला. हे गोदाम राजू साबळे याचे आहे. त्याचे नील हॉटेलही आहे. या हॉटेलसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक टाक्यांमध्ये थेट गॅस टँकरमधूनच अवैधरित्या गॅस काढून घेऊन भरला जात होता. अशाच प्रकारे गॅसची वाहतूक करणारे टँकर रस्त्यातील हॉटेल, धाबे येथे थांबून अवैधरित्या त्यातून गॅस काढून तो व्यावसायिक कारणासाठी वापरला जात असल्याचे पोलीस तपासात आढळले.

चौकशीतील प्राथमिक माहितीनुसार, केडगावमधील अनुराज टायर गोदामासमोर टँकर थांबवून थेट टँकरमधूनच भारत गॅसच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरण्यात येत होता. साबळे याच्याच मालकीचे हे गोदाम असून त्याचेच नील हॉटेल येथे हा गॅस वापरला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. टँकर चालक रस्त्यातील इतर हॉटेल आणि धाब्यांनाही अशाप्रकारे गॅस पुरवठा करीत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले.

लायसन्सशिवाय, ज्वलनशील पदार्थ हाताळण्याचे आवश्यक नियम व सुरक्षिततेची काळजी न घेता धोकादायक पद्धतीने ‘रिफीलिंग’ केल्यामुळे आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कबाडी यांनी दिली.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरीश भोये व अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार लक्ष्मण खोकले, ह्रदय घोडके, दीपक घाटकर, बिराप्पा करमल, राहुल द्वारके, शामसुंदर जाधव, भीमराज खडसे, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सतिश भवर, योगेश कर्डिले, प्रमोद जाधव, प्रशांत मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22
Next Post
Gita Hinge

Gita Hinge : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे यांचे अपघाती निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.