Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

AC Vs Cooler : उन्हाळ्यात एसी की कुलर? जाणून घ्या, कोणता आहे तुमच्यासाठी ‘परफेक्ट’ पर्याय.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 March 2026, 20:10
AC Vs Cooler

photo- social media

AC Vs Cooler : उन्हाळा वाढत असताना घरात थंडावा मिळवण्यासाठी एसी की कुलर, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. निर्णय बहुतेक वेळा वीज बिलावर घेतला जातो. एसी महाग, कुलर स्वस्त. पण केवळ खर्चच नव्हे, तर आरोग्यावर होणारा परिणामही तितकाच महत्त्वाचा आहे.

एसीचा मोठा फायदा म्हणजे तो कमी वेळात खोली थंड करतो. त्यामुळे अत्यंत उष्णता असलेल्या शहरांमध्ये, बंद जागांमध्ये किंवा ऑफिससारख्या ठिकाणी तो अधिक प्रभावी ठरतो. मात्र, सतत एसीमध्ये राहणाऱ्यांसाठी काही धोकेही आहेत. डॉक्टरांच्या मते, शरीर एसीच्या स्थिर तापमानाशी जुळवून घेतं; पण बाहेरच्या उन्हातून थेट एसीमध्ये जाणं किंवा वारंवार आत-बाहेर करणं शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतं. अशा तापमानातील अचानक बदलांमुळे नाक, घसा आणि कानाशी संबंधित समस्या वाढतात, तसेच व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो. याशिवाय, एसीमुळे त्वचा कोरडी पडणे, डोकेदुखी आणि घशात खवखव यासारख्या तक्रारीही दिसून येतात.

 

दुसरीकडे, कुलर हा तुलनेने नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो. कुलर हवेतील आर्द्रता टिकवून ठेवतो आणि वातावरण हळूहळू थंड करतो. त्यामुळे शरीराला तापमानातील अचानक बदल सहन करावे लागत नाहीत. तसेच वीज खर्चही कमी असल्याने तो सर्वसामान्यांसाठी अधिक परवडणारा पर्याय ठरतो. मात्र, अतिशय दमट हवामानात कुलरची कार्यक्षमता कमी होऊ शकते.

तज्ज्ञांचा सल्ला स्पष्ट आहे. कोणताही पर्याय निवडताना योग्य काळजी घेणं महत्त्वाचं. खूप थंड पाणी पिणं, एसीमधून थेट उन्हात जाणं किंवा उलटं करणं टाळावं. एसी वापरताना तापमान संतुलित ठेवावं आणि कुलर स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे.

एकंदरीत, कुलर हा पर्यावरणपूरक आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित पर्याय मानला जात असला, तरी परिस्थितीनुसार दोन्हींचा योग्य वापर करणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

Disclaimer :
या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या चर्चांवर आधारित असून ही केवळ सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणताही उपाय किंवा सल्ला अमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या माहितीचा वापर करताना झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी पुणे प्राईम न्यूज जबाबदार राहणार नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14

केसनंदमध्ये बिगर शेती परवान्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 35 लाखांची फसवणूक; वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 6 June 2026, 18:30
Next Post
Dhurandhar 2 Box Office Collection

Dhurandhar 2 Box Office Collection : सुपरहिट की ब्लॉकबस्टर? गुढीपाडव्याचे शुभमुहूर्त ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा थिएटरमध्ये राडा; पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.