Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सहकारी साखर कारखान्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 13 सदस्यीय समिती स्थापन; साखर उद्योगात काय बदल होणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 November 2026, 14:53

पुणे : राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. साखर कारखानदारी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यांची विशेष समिती नेमण्यात आली आहे. या समितीला आपला सविस्तर अभ्यास अहवाल आणि शिफारशी सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

सहकार विभाग आणि राज्य सहकारी बँक संयुक्तपणे राज्यातील कारखान्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत. कारखाने बंद पडण्यामागील नेमकी कारणे आणि आर्थिक अडचणींचा शोध या समितीमार्फत घेतला जाईल. या समितीमध्ये सहकार आयुक्त, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, राज्य सहकारी बँक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे.

अडचणीतील कारखान्यांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक कारखान्याची स्वतंत्र आर्थिक क्षमता तपासली जाणार आहे. यामध्ये खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम केले जाईल:

कर्ज आणि गुंतवणूक धोरण: एनपीए श्रेणीतील कारखान्यांच्या कर्ज निवारणासाठी रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने विशेष आराखडा तयार होईल. तसेच, हंगामानुसार स्वतंत्र कॅश क्रेडिट खाते, कर्ज परतफेडीचे धोरण, बाह्य गुंतवणूकदारांचा सहभाग आणि एनसीडीसीमार्फत भांडवली मदत मिळवण्याबाबत धोरण ठरवले जाईल.

ऊर्जा संकुल आणि अतिरिक्त उत्पन्न: कारखान्यांना केवळ साखर निर्मितीवर अवलंबून न ठेवता त्यांचे ‘ऊर्जा संकुलात’ रूपांतर केले जाईल. इथेनॉल, सीबीजी (CBG), हरित हायड्रोजन, सौर ऊर्जा, सहवीज निर्मिती आणि शाश्वत विमान इंधन निर्मितीला चालना दिली जाईल. 10 विविध उपपदार्थांच्या निर्मितीसाठी ‘झिरो वेस्ट’ बायो-रिफायनरी मॉडेल विकसित केले जाणार असून, यासाठी केंद्राचा 20 टक्के, राज्याचा 10 टक्के आणि कारखान्यांचा 70 टक्के निधी वापरण्याच्या प्रस्तावाची तपासणी होईल.

आधुनिक शेती तंत्रज्ञान: ऊस उत्पादन आणि साखर उतारा वाढवण्यासाठी एआय, ड्रोन, जीपीएस आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्यावर भर दिला जाईल. यासोबतच दर्जेदार बियाणे, मातीचे आरोग्य आणि पीक फेरपालट यांसारख्या विषयांचाही सखोल अभ्यास ही समिती करणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सहकारी साखर कारखान्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 13 सदस्यीय समिती स्थापन; साखर उद्योगात काय बदल होणार?

Tuesday, 24 November 2026, 14:53

“चाकणकरांचा राजीनामा मग चंद्रकांत पाटलांसाठी वेगळे निकष का?” रवींद्र धंगेकर आक्रमक! म्हणाले “चंद्रकांतदादांसाठी खरातबाबाने वेगळे टेबल..”

Tuesday, 24 November 2026, 14:51

शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी सरकार घेणार? बावनकुळेंनी केला मोठा खुलासा; कुळ कायद्याबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण..

Tuesday, 24 November 2026, 14:15

कोरियन ग्लास स्किन हवीये? चेहऱ्यावर काचेसारखा चमकदार ग्लो मिळवण्यासाठी करा हे 6 खास उपाय; घरच्याघरी मिळवा सुंदर त्वचा

Tuesday, 24 November 2026, 14:14

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवड

Tuesday, 24 November 2026, 13:57

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! थेट १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास आणि मालमत्ता जप्ती; राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीचा निर्णय

Tuesday, 24 November 2026, 13:32
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp