Sunday, July 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींना धक्का! मोफत साडी योजना ठप्प; आर्थिक चणचणीमुळे सरकारचा ब्रेक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 17 July 2026, 12:17

पुणे : महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय असणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ‘चांगलीच चर्चेत आली. या योजनेतील महिलांची नावे वगळल्याची चर्चा सुरु असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठा धक्का दिला आहे.अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी मोफत साडी देणारी ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ आता पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शासनाच्या तिजोरीवर पडणारा अतिरिक्त आर्थिक ताण आणि इतर विविध योजनांचे वाढते दायित्व यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जून 2023 मध्ये राज्याच्या ‘एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत (2023-28) ही योजना जाहीर केली होती. विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश ‘अंत्योदय’ रेशन कार्डधारक कुटुंबांमधील महिलांना दरवर्षी एक मोफत साडी देणे हा होता. गरजू कुटुंबांना वस्त्रपुरवठा करणे आणि राज्यातील पॉवरलूम क्षेत्राला आर्थिक चालना देणे, हे या उपक्रमामागचे दुहेरी उद्दिष्ट होते.

वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत राज्यात अनेक वेगवेगळ्या जनकल्याणकारी योजना सुरू आहेत. या सर्व योजनांचा वाढता आर्थिक भार, शासनावरील इतर आर्थिक जबाबदाऱ्या आणि भविष्यातील प्रस्तावित खर्च लक्षात घेता, ही साडी वाटप योजना पुढील काळात सुरू ठेवणे संयुक्तिक ठरणार नाही.

 

यापूर्वीच राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या छाननीदरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे सुमारे 92 लाख महिलांची नावे यादीतून वगळली होती. त्यानंतर आता थेट गरिबांची मोफत साडी योजनाच बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. यंदाच्या दिवाळीत गरिबांच्या घरात ही शासकीय साडी पोहोचणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुनील मोरेंचं खोटं उघड!कार नदीत टाकण्याआधी मुलांसोबत काय घडलं? पोस्टमार्टम रिपोर्टचा धक्कादायक खुलासा..

Saturday, 18 July 2026, 23:06

दुधाच्या हव्यासापायी जीवाशी खेळ! FDA ची गोठ्यावर धाड, शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त

Saturday, 18 July 2026, 22:37

धंगेकर दाम्पत्य अडचणीत! पुण्यातील बिल्डरच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Saturday, 18 July 2026, 22:18

समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला; डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन, सोमवारी पुण्यात अंत्यसंस्कार

Saturday, 18 July 2026, 21:55

शिंदेंचा मास्टरस्ट्रोक यशस्वी! 6 बंडखोर खासदार अधिकृतपणे गटात, ठाकरे गटाला धक्का

Saturday, 18 July 2026, 21:12

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! शिवराज मोटेगावकरच्या RCC क्लासेसमध्ये CBI ची एंट्री; चौकशीने खळबळ

Saturday, 18 July 2026, 20:41
Next Post

सिया-चेतनचा 'फ्री सेक्स' ग्रुप? केतन हत्या प्रकरणात धक्कादायक दावे; सीसीटीव्ही फुटेज ठरले तपासातील मोठा टर्निंग पॉइंट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.