पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, ठाण्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 ही असणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे येथे प्रशिक्षण प्रभारी (वैद्यकीय अधिकारी) आणि प्रशासकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 20000 ते 60000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई सर्कल ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय वार्ड, धर्मवीर नगर-2, ठाणे (प.) 400604 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.