पुणे: मकर संक्रांतीला (Rajyog in Makar) सूर्य जेव्हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा आपण मकर संक्रांती साजरी करतो. पण यंदा या संक्रमणासोबतच 18 जानेवारी रोजी ‘मंगळ’ ग्रहाचेही मकर राशीत आगमन होणार आहे. सूर्य आणि मंगळ हे दोन्ही अत्यंत तेजस्वी आणि उग्र ग्रह मानले जातात. या दोघांच्या एकत्र येण्यामुळे ‘राजयोग’ निर्माण होत आहे, ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर नक्कीच होणार आहे.

ज्योतिषीय विश्लेषकांनुसार, सूर्य हा ‘आत्मा’ आणि मंगळ हा ‘ऊर्जा’ मानला जातो. जेव्हा हे दोन अग्नी तत्त्वाचे ग्रह मकर राशीत एकत्र येतात, तेव्हा संघर्ष आणि प्रगती या दोन्ही गोष्टी हातात हात घालून येतात. मात्र, हा योग काही राशींसाठी सावध राहण्याचा इशारा देणारा आहे. विशेषतः मेष, वृषभ, मिथुन, सिंह आणि वृश्चिक या राशींच्या व्यक्तींनी पुढील काही दिवस संयम पाळणे गरजेचे आहे.
दैनंदिन जीवनात याचा परिणाम कसा दिसेल?
कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद होणे, घाईघाईत घेतलेले आर्थिक निर्णय अंगलट येणे किंवा वाहन चालवताना झालेली छोटीशी चूक महागात पडणे, असे अनुभव येऊ शकतात. मेष राशीच्या लोकांनी करिअरमध्ये घाई करू नये, तर वृषभ राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवावे. मिथुन राशीसाठी मानसिक शांतता जपण्याचे हे दिवस आहेत. या काळात नकारात्मकता टाळण्यासाठी सूर्याची उपासना करणे किंवा दानधर्म करणे शुभ मानले जाते.







