पुणे: अनेकांच्या शरीरावर लहान, लाल रंगाचे तीळ (Red Moles) असतात. हे तीळ साधारणपणे खांदे, छाती किंवा पोटावर अधिक दिसून येतात. त्यांना वैद्यकीय भाषेत ‘चेरी अँजिओमा’ असे म्हणतात. अनेकदा हे लाल रंगांचे तीळ पाहिल्यावर लोक चिंताग्रस्त होतात, पण बहुतेक प्रकरणांमध्ये हे लाल तीळ हानिकारक नसतात.

लाल तीळ कशामुळे येतात?
- लाल तीळ येण्यामागे खालील प्रमुख कारणे आहेत, ज्यांचा थेट संबंध त्वचेच्या खालील लहान रक्तवाहिन्यांच्या वाढीशी असतो:
- लाल तीळ येण्याचे हे सर्वात सामान्य आणि मुख्य कारण आहे. जसजसे वय वाढते, तसतसे त्वचेच्या खालील रक्तवाहिन्यांची वाढ होते, ज्यामुळे हे लाल तीळ दिसू लागतात.
- तुमच्या कुटुंबातील कोणाला (आई-वडील) असे लाल तीळ असल्यास, ते तुम्हाला येण्याची शक्यता जास्त असते.
- हार्मोनल बदलांमुळे गर्भवती महिलांच्या त्वचेवर हे तीळ तात्पुरते दिसू शकतात.
- काही विशिष्ट रासायनिक घटकांच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास लाल तीळ येऊ शकतात.
आरोग्य संकेत आणि काळजी:
चेरी अँजिओमा हे कर्करोगाचे (Cancer) किंवा इतर गंभीर आजारांचे लक्षण नाही. ते सामान्य काळ्या तीळा प्रमाणे असतात. ते त्वचेवर वर्षानुवर्षे राहू शकतात आणि त्यांचा आकार बदलत नाही.
तर डॉक्टरांना भेटाल?
जर लाल तीळ अचानक खूप वेगाने वाढू लागले, त्यातून रक्तस्त्राव होत असेल किंवा त्याचा रंग बदलला असेल, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते हानिकारक नसले तरी, डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे असते.







