लोणी काळभोर, ता. 14 : कुंजीरवाडी (Kunjirwadi News) (ता. हवेली) ग्रामपंचायत कार्यालये हायटेक झाल्यामुळे नागरिकांना आता विविध सरकारी योजनांची माहिती, दाखले आणि अर्ज ऑनलाइन मिळवता येणार आहेत, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल. डिजिटल सुधारणांमुळे प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि वेग येईल, तसेच ग्रामस्थांना आवश्यक सेवा लवकर उपलब्ध होतील. असे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे.

कुंजीरवाडी ग्रामपंचायतीचे नवीन कार्यालय व ‘श्री स्वामी विवेकानंद वाचनालया’चे भव्य उद्घाटन आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते सोमवारी (ता.10) करण्यात आले. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन कटके यांनी केले आहे. यावेळी यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पुनम सागर चौधरी, सरपंच हरेश गोठे, उपसरपंच सुरेखा गाढवे, कोलवडीचे सरपंच विनायक गायकवाड, माजी सरपंच सचिन तुपे, माजी सरपंच मंगेश कानकाटे, आरोग्य दूत युवराज काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कटके म्हणाले की, गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे काम जोमाने चालु असून या नवीन इमारतीमध्ये गावातील मुलं आणि महिलांसाठी एक सुसज्ज “श्री स्वामी विवेकानंद वाचनालय” सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयात अभ्यास, वाचन आणि महिलांच्या स्वयंविकासासाठी आवश्यक पुस्तके व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे वाचनालय आजपासून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार कटके यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, सरपंच हरेश गोठे यांनी हा समाजोपयोगी उपक्रम राबवून गावाला विकासाच्या दृष्टीकोनातून पुढे नेण्यासाठी उचललेले हे एक चांगले पाऊल आहे. लोकहितकारी योजना राबविल्यावरच खरा गावाचा विकास होतो. हे हरेश गोठे यांनी करून दाखविले आहे. असे म्हणून आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सरपंच हरेश गोठे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.
यावेळी डाळिंब उत्पादन संघाचे सचिव गोरख घुले, बापू घुले, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल, चंद्रकांत मेमाणे, सागर निगडे, अजय कुंजीर, अर्चना धुमाळ, लता कुदळे, अलका कुंजीर, सारिका भोंगळे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, आदेश जाधव, काळूराम कुंजीर, अमोल लोंढे,धनंजय धुमाळ, नारायणकुंजीर, माऊली सावंत, भाऊ जगताप, संदीप कुंजीर, मनोज चौधरी, भाऊसाहेब झेंडे, निर्मला धुमाळ, गोरख तुपे, ग्रामपंचायत अधिकारी सविता भुजबळ, आरोग्य अधिकारी रुपाली लोखंडे, रुपाली बंगाळे, पशुवैद्यकीय अधिकारी अभिजित निकाळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







