Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निगडी पोलीस ठाण्यातील ‘सरस्वती’च्या धाडसाचे सगळीकडे होतेय कौतुक ; पिस्तुलाचा धाक दाखवून ११ लाख लुटणाऱ्या दोन चोरट्यांना अटक…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 27 September 2022, 17:36

पिंपरी : पेट्रोलपंपावरील अकरा लाखांपेक्षा जास्त रकमेचा भरणा करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने नागरिकांच्या मदतीने पकडले आहे. हि घटना आकुर्डी येथील खंडोबामाळ चौकातील तुळजा भवानी मंदिराजवळ सोमवारी (ता. २६) घडली आहे.

सरस्वती काळे असे कर्तबगार महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर पोलिसांनी चोरट्यासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.

निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवानिमित्त आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातील तुळजा भवानी मंदिराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी ( ता. २६) दुपारी तुळजा भवानी मंदिराजवळ बंदोबस्तावर निगडी पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी सरस्वती काळे होत्या. त्यावेळी आकुर्डी येथील एका पेट्रोलपंपाची ११ लाखांपेक्षा जास्तीची रक्कम महाराष्ट्र बँकेच्या खंडोबामाळ चौकाजवळील शाखेत भरणा करण्यासाठी पेट्रोलपंपाचे कर्मचारी आले.

 

दरम्यान, पेट्रोलपंपावरील कर्मचारी बँकेच्या पायऱ्या चढून जात असताना, एका चोरट्याने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली रोकड बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरट्याच्या हातात पिस्तूल पाहून तेथील नागरिकांची धावाधाव सुरू होऊन गोंधळ उडाला. या घटनेची माहिती बंदोबस्तावरील सरस्वती काळे यांना मिळताच, त्यांनी लगेच बँकेजवळ धाव घेतली. त्यावेळी पेट्रोलपंपाचा कर्मचारी आणि चोरट्या झटापट सुरू होती.

पोलीस कर्मचारी सरस्वती काळे यांना नागरिकांच्या मदतीने चोरट्याला पकडले. आणि त्याच्याकडील पिस्तूल ताब्यात घेतले. त्यानंतर निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, मिरचीपूड मिळून आली.

दरम्यान, चार जिवंत काडतुसे असलेले पिस्तूल चोरट्याच्या हातात होते. तरीही न घाबरता महिला पोलीस कर्मचारी सरस्वती काळे यांनी प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने चोरट्याच्या हातातील पिस्तूल काढून घेऊन त्याला पकडले. या धाडसाचे शहर पोलीस दलातून सरस्वती काळे यांचे कौतूक होत आहे. तसेच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या धाडसाबद्दल सरस्वती काळे यांना १० हजारांचा रिवॉर्ड जाहीर केला आहे. मंगळवारी निगडी पोलीस ठाण्यात सरस्वती काळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचे माजी प्राचार्य एम. आर. राऊत सर यांचे निधन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.