Suicide | पुणे : सासरच्या लोकांकडून वारंवार होणार्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून नवविवाहितेने राहत्या घरी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला लायटरने पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. रविवारी (ता. ०२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
ऋतुजा अनिकेत उर्फ विशाल विधाते (वय – २४, रा. कृष्णाई अपार्टमेंट बाणेर) असं त्यांचं नाव आहे. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.
याप्रकरणी पती अनिकेत विधाते, सासू जयश्री विधाते, सासरे निवृत्ती विधाते, चुलत सासरे तुकाराम विधाते यांच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२९ नोव्हेंबर २०२२ रोजी अनिकेत याच्यासोबत ऋतुजाचा विवाह…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अनिकेत याच्यासोबत ऋतुजाचा विवाह झाला होता. तेव्हापासून ती सासरी नांदत असताना सासरच्या मंडळीकडून तिचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता.
दरम्यान, सतत होणार्या त्रासाला कंटाळून ऋतुजाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून लायटरने पेटवून घेतलं. हा प्रकार घडल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र मंगळवारी तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक झरेकर करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime News : माझ्याकडे पण वर्दी म्हणत पोलीस महिलेला मारहाण