pune crime : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या बातम्या या समोर येत आहे. वारंवार घडणाऱ्यां घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. आता सिंहगड कॉलेज परिसरातून थरकार उडवणारी घटना समोर आली आहे. सिंहगड कॉलेज परिसरातील इमारतीजवळ तरुणावर कोयत्याने वार करत कुंड्याने मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. (pune crime)

मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद असे या मृत तरूणाचे नाव असून त्याचे वय अंदाजे २० ते २२ असल्याची माहिती आहे. हा संपूर्ण प्रकार पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरातील इमारतीजवळ घडलेल्याने या ठिकाणी काही काळ भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. आरोपीने कोयता आणि कुंड्याचा वापर करून तरूणाची निर्घृण हत्या केली आहे. तसेच तरूणाचा मृतदेह परिसरात टाकून त्याने तिथून पळ काढला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
यापूर्वीच बाजीराव रस्त्यावर मयंक खराडे याची दिवसा-दिवसा कोयत्याने हत्या झाल्यानंतर पुण्यातील सलग खुनांच्या घटनांनी नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






