इंदापूर,आदित्य बोराटे –

Indapur :- वडापुरी (ता.इंदापूर) येथे गुरुवारी (दि.5) मार्च रोजी चोरीची घटना घडली होती.ती चोरी पुतण्यानेच चुलत्याचे घर फोडून धूम ठोकली होती. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत सोन्याचे दागिने व रोकड असा 3 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात सौ. स्वप्नाली कृष्णा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यांनी 2 लाख 84 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 45 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरी केली होती.या घटनेचे गांभीर्य ओळखून इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना पो.हवालदार विनोद रासकर आणि त्यांच्या पथकाला तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गोपनीय बातमीदाराकडून फिर्यादी यांचा सख्खा पुतण्या महेश ज्ञानदेव पवार (वय 19 वर्षे, रा. वडापूरी ता. इंदापुर ) यास ताब्यात घेवून त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा करून गुन्हयातील चोरी केलेला सोन्याच्या दागीन्यांची त्याचे साथीदार श्रीशैल्य उर्फ शंभु आनंद देशमुख (वय 24 वर्षे मुळ, रा. संग्रामनगर अकलुज ता. माळशिरस, जि. सोलापुर, सध्या रा. माळवाडी न.2 ता.इंदापूर) व सुनिल चंद्रकांत रणखांबे (वय 26 वर्षे, रा. पंचायत समिती कॉलनी, इंदापुर) यांचे मदतीने इंडी, राज्य कर्नाटक येथे विक्री केल्याचे कबुल केले. गुन्हयातील सोन्याचे दागीने इंदापूर पोलीसांनी इंडी, राज्य कर्नाटक येथे जावुन हस्तगत केले.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, पो.हवा.विनोद रासकर,शिंदे, पो.कॉ.अंकुश माने, सागर क्षीरसागर,हसीम मुलानी, मोहन आनंदगावकर,सौरभ पाटील यांच्या पथकाने केली असून पुढील अधिक तपास पोलीस हवालदार विनोद रासकर करीत आहेत.







