Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor : महाशिवरात्रीच्या यात्रेत बनेश्वर परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 February 2026, 20:45
bhor

photo- social media

Bhor : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र बनेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असताना दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत दोन्ही बाजूंचे काही जण जखमी झाले असून, परस्परांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात्रेच्या गर्दीत घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास बनेश्वर मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मनोरंजन स्टॉल परिसरात ही घटना घडली. विजय बापुराव सपकाळ (वय ३०, रा. बाजारवाडी, ता. भोर) हे लहान मुलांसाठी मनोरंजन स्टॉल चालवत असताना फंडाच्या पैशांच्या कारणावरून पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून काही जणांनी तेथे येत वाद घातल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

तक्रारीनुसार, संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून सपकाळ यांना हाताने व काठीने मारहाण केली, शिवीगाळ व दमदाटी केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आल्याचे नमूद आहे. यावेळी सपकाळ यांच्या आजीच्या हातातील काठी हिसकावून पाठीवर व कंबरेवर मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेत फिर्यादी व त्यांच्या आजीला दुखापत झाली. तसेच स्टॉलची तोडफोड करून नुकसान केल्याचीही तक्रार देण्यात आली आहे.

दरम्यान, याच घटनेप्रकरणी अनिकेत चंद्रकांत जाधव (वय २५, रा. बाजारवाडी) यांनीही स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा बनेश्वर मंदिर कमानीजवळील जानकीराम मंगल कार्यालय परिसरात फंडाच्या पैशांवरून विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर दुसऱ्या गटाकडून वाद घालण्यात आला. त्यानंतर लाकडी बांबूने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड करून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार राजगड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी गर्दी असताना घडलेल्या या घटनेमुळे काही काळ यात्रेतील वातावरण ढवळून निघाले होते.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदारांकडून सुरू असून, घटनेतील सर्व संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच साक्षीदारांचे जबाब व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलीसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40
Next Post
Pune

Pune : गुन्हा नाही तरी रस्त्यावर का बसवलं? बुधवार पेठेतील 'मिडनाईट रेड'वरून संताप; ६०० पोलिसांच्या 'कमांडो ॲक्शन'नंतर पुणे पोलीसच अडचणीत येणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.