Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा विळखा अधिक घट्ट; दोन महिन्यांत १७ गुन्हे, १०५ साक्षीदारांचे जबाब, ईडीचाही तपास वेगात

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 May 2026, 11:23
Ashok Kharat Viral Videos: Direct "jail" if you share videos of victims in the Ashok Kharat case! SIT's final warning to social media influencers and portals

Ashok Kharat पुणे, ता. १७ : राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण झाले असून, तपासाचा फास दिवसेंदिवस अधिक आवळला जात आहे. “चोर आले, चोर आले…” असा बनाव रचत गुंडविरोधी पथकाने केलेल्या नाट्यमय कारवाईत खरातला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात अंधश्रद्धा, महिलांवरील अत्याचार, कोट्यवधींचे आर्थिक गैरव्यवहार, बनावट खाती आणि राजकीय संबंध अशा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. Ashok Kharat

सध्या अशोक खरात हा सिन्नर पोलिसांच्या ताब्यात असून, विशेष तपास पथक (SIT) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत. गेल्या दोन महिन्यांत तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईमुळे राज्यातील सहकार, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. Ashok Kharat

दोन महिन्यांत १७ गुन्हे दाखल
अशोक खरातविरोधात नाशिक, सिन्नर, शिर्डी आदी भागांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत १७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. महिलांची फसवणूक, धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन लैंगिक अत्याचार, कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक, जमीन व्यवहारातील गैरप्रकार आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. एसआयटीने वेगाने तपास करत पहिल्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. Ashok Kharat

१०५ साक्षीदारांचे जबाब नोंद
तपास यंत्रणांनी खरातविरोधात मजबूत पुरावे गोळा करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत १०५ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यात पीडित महिला, आर्थिक फसवणुकीचे बळी ठरलेले नागरिक आणि खरातच्या व्यवहारांशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे. पोलिसांनी अत्याचार, आर्थिक व्यवहार आणि जमीन खरेदी-विक्रीतील संशयास्पद हालचालींची साखळी जोडण्यात महत्त्वाचे यश मिळवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. Ashok Kharat

 

तपासादरम्यान समता आणि जगदंबा पतसंस्थांमध्ये बोगस खाती उघडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सिन्नर पोलिसांनी शिवनिका संस्थांचे सचिव नामकर्ण आवारे यांना अटक केली असून, या कारवाईनंतर सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

राजकीय संबंधांमुळे प्रकरण चर्चेत
या प्रकरणात काही राजकीय संबंधही तपासाच्या कक्षेत आल्याची माहिती समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली आहे. प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी, तर रुपाली चाकणकर यांची एसआयटी आणि ईडीने चौकशी केल्याचे समोर आले आहे.

ईडीची छापेमारी; पत्नी अजूनही फरार
अशोक खरातने फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आणि जमिनी खरेदी केल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर ईडीने त्याच्या विविध मालमत्तांवर छापेमारी केली. दरम्यान, जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ती गेल्या ५० दिवसांपासून फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.

तपासातील मोठा धक्का – महत्त्वाच्या साक्षीदाराचा मृत्यू
या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक घडामोड म्हणजे शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू. डॉ. शेळके हे खरातच्या अनेक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती असलेले व्यक्ती मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात असून, या घटनेने तपासाला वेगळे वळण मिळाले आहे.

तपास अंतिम टप्प्यात
दोन महिन्यांच्या तपासानंतर आता अशोक खरात प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडले असून, तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आर्थिक फसवणूक, लैंगिक अत्याचार, बेनामी मालमत्ता आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून उभारलेले जाळे याबाबत तपास यंत्रणांकडे महत्त्वाचे पुरावे जमा झाले आहेत. आगामी काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24
Next Post
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Accident : पुण्यात ‘टाटा पंच’कार ६ दुचाकी, रिक्षाला उडवत थेट दुकानात घुसली, अपघातात ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp