सोलापूर: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णीजवळ (7777 Hotel News) एका हॉटेलमध्ये (7777 Hotel Viral Video) मॅनेजरला नग्न करून मारहाण केल्याची (Solapur News) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरलझाला आहे. हॉटेलमध्ये काम करत असलेल्या मॅनेजरकडून चुकी झाली म्हणून त्याला नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. टेंभुर्णी येथील 77 77 या हॉटेलचा मालक लखन माने यानेच ही मारहाण केल्याचं समोर आले असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. (Breaking News)

या घटनेबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनुसार, लखन हरिदास माने याने मॅनेजरला काम नीट होत नसल्याच्या कारणावरून नग्न करून लोखंडी पाइपने सर्वांसमोर मारहाण केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर मारहाण झालेला व्यक्ती हॉटेलचा मॅनेजर निवास आप्पासाहेब नकाते आणि मारहाण करणारा हॉटेल मालक लखन माने असल्याचं स्पष्ट झालं. पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी संशयिताला अटक केल्याची माहिती दिली.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ऑगस्ट 2025 मध्ये लखन माने याने मॅनेजरच्या अंगावरचे कपडे जबरदस्तीने काढून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये घेतले आणि त्यानंतर अर्धनग्न अवस्थेत हॉटेलबाहेर आणून शिवीगाळ करत लोखंडी पाइपने मारहाण केली. ‘तू याबाबतीत तक्रार दिली किंवा काम सोडलं’ तर जीव घेण्याची धमकीही दिल्याचे त्याने दिली होती. या प्रकरणात व्हिडिओ काढणाऱ्यांनी तो सोशल मीडियावर शेअर केल्याने घटना पुन्हा चर्चेत आली.
दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेल मालक लखन माने आणि मॅनेजर यांचा सोबतचा व्हिडिओही समोर आला. या व्हिडिओमध्ये माने यांनी हा प्रकार चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा दावा केला आणि त्यामागे त्यांचे नाव आणि हॉटेल बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हटलं. मॅनेजरनेही या व्हिडिओमध्ये बोलताना काही काळापूर्वी त्याने दारू पिऊन चुकीचं वर्तन केलं होतं आणि त्यावेळी त्याला शिक्षा करण्यात आली होती, असं सांगितले. त्याने हॉटेल मालक आणि स्टाफला ‘हे माझं कुटुंब आहे’ असं सांगत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी चुकीची माहिती पसरवू नये, अशी विनंती केली. हॉटेल मालकाने त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला. या प्रकरणाचा पुढील तपास टेंभुर्णी पोलिस ठाण्याकडून सुरू आहे.







