दिल्ली : दिल्लीतील वजीराबाद (Delhi Crime) परिसरात सोशल मीडियावर (Delhi News) ओळख झालेल्या एका मित्राने अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मुलीला ब्लॅकमेल करून हॉटेलमध्ये नेले होते, पण कॅब ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. (Latest Crime News)

या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर दिल्लीतील वजीराबाद भागात एका १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. आरोपी मित्राने शुक्रवारी मुलीला ब्लॅकमेल केले आणि हॉटेलमध्ये घेऊन गेला. मात्र, कॅब ड्रायव्हरला काहीतरी संशयास्पद वाटले आणि त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पीडित तरुणी दोन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर नूह येथील रहिवासी साबीर नावाच्या तरुणाच्या संपर्कात आली होती. वारंवार गप्पांमधून त्यांची मैत्री झाली. साबीरने एका मोठ्या कंपनीत काम करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी आरोपीने पीडितेला वजीरपूर येथील मित्राच्या फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावले. आरोपीने मुलीला फ्लॅटमध्ये नेले, तिला जीवे मारण्याची धमकी दिली, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि मोबाईल फोनवर तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवले, असा आरोप आहे.
याच व्हिडिओ आणि फोटोंच्या आधारे आरोपीने विद्यार्थिनीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले आणि तिला पुन्हा काश्मिरी गेट परिसरात भेटण्यासाठी बोलावले. आरोपीने मुलीला कॅबमध्ये कमला नगरमधील एका हॉटेलमध्ये नेले. दरम्यान, कॅब ड्रायव्हरला त्यांच्यावर संशय आला. त्याने त्यांना हॉटेलमध्ये सोडल्यानंतर तो थेट जवळच्या रूप नगर पोलिस स्टेशनमध्ये गेला. तिथे कॅब ड्रायव्हरने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस त्वरित हॉटेलमध्ये पोहोचले आणि आरोपीला अटक केली. पोलिसांनी मुलीला त्याच्या ताब्यातून सोडवले आणि तिच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली.







