करमाळा: देवाकडून मिळणारा न्याय जरी उशिरा मिळत असला तरी तो अचूक आणि योग्य मिळतो, कारण देव कधीही अन्याय करत नाही. “भगवान के घर देर है, अंधेर नहीं” याच म्हणीची प्रचीती करमाळा तालुक्याला आज आली आहे. मागील दोन वर्षापूर्वी बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी ‘मुक्या अंकल’ ला बार्शी (जि. सोलापूर) येथील पोक्सो विशेष व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य के. मांडे यांनी सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिचे पती महादेवाचे दर्शनाला 2023 साली गेले होते. दर्शन घेऊन दुपारी घरी परतले असता, त्यांची चार वर्षांची मुलगी निर्भया घरात रडत बसलेली आढळली. रडण्याचे कारण विचारले असता, तिने कथितरित्या सांगितले की, ती मुक्या अंकलच्या घरी खेळण्यासाठी गेली होती. घरात कोणी नसताना आरोपीने निर्भयाला घरात बोलावून आतून कडी लावली व लैंगिक अत्याचार केला. यावेळी पिडीतेने मोठ्याने आरडाओरड केली असता आरोपीने तिचे तोंड दाबल्याचा प्रयत्न केला होता. अशी फिर्याद निर्भयाच्या आईने करमाळा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार आरोपीच्या विरोधात पॉस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, करमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे यांनी आरोपी ‘मुक्या अंकल’ ला त्वरित अटक केली होती. व आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला कोठडी सुनावली होती. तेव्हापासून सोलापूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
या गुन्ह्याचा खटला बार्शी न्यायालयात सुरु होता. या खटल्यात आरोपी ‘मुक्या अंकल’ याच्यामार्फत अॅड. सच्चिदानंद लोणकर व अॅड. एम. ए. कदम हे केस लढत होते. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने पिडीत निर्भया, पिडीतेची आई (फिर्यादी), पिडीतेची मोठी बहीण, आज्जी, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासिक नोंदविण्यात आल्या. अॅड. सच्चिदानंद लोणकर यांनी सर्व साक्षीदारांची सखोल उलटतपासणी करून साक्षींतील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच मेडिकल रिपोर्ट देखील निगेटिव्ह असल्याचे पुरावे सादर केले. हेच युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी ‘मुक्या अंकल’ याची लैंगिक अत्याचारासह अन्य सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे.
“जीत आखिर सच्चाई की हुई”
‘मुक्या अंकल’ हा करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात राहतो. तो विशेष मुलगा असूनदेखील त्याचे आठवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. आई वडिलांच्यावर आपला भार पडून नये म्हणून तो काम सुद्धा करत होता. त्याची जन माणसात चांगली प्रतिमा होती. परंतु, कोणाचाही विश्वास न बसणारा आरोप त्याच्यावर लागला. आणि अख्ख्या गावाला याचा धक्का बसला. ‘मुक्या अंकल’ या गुन्ह्यांतर्गत त्याला तब्बल 2 वर्ष न्यायालयात शिक्षा देखील भोगावी लागली आहे. परंतु, जीत आखिर सच्चाई की हुई! या वाक्याप्रचाराप्रमाणे त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.







