अकोला: अकोला जिल्ह्यातील (Shocking Crime) तेल्हारा तालुक्यातून माणुसकीला काळीमा (Crime News) फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अडसूळ नावाच्या (Akola News) गावात एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनी, काकाने आणि शेजारी राहणाऱ्या (Akola Crime) एका आजोबाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही पीडिता केवळ १२ वर्षे ८ महिने आणि २२ दिवसांची असून, तिच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून घरातील आणि ओळखीच्याच नराधमांकडून अत्याचार सुरू होता. (Latest Breaking News)

मुलीला त्रास असह्य
हा सर्व प्रकार तेव्हा उघड झाला जेव्हा पीडित मुलीला होणारा त्रास असह्य झाला. तिने मोठ्या धैर्याने आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. योगायोगाने त्याच वेळी शाळेत चाईल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक गणेश ठाकरे आणि चाईल्ड लाईनच्या पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तेल्हारा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
तिसरा आरोपी फरार
पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा क्रमांक ३८२/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नराधम वडील आणि शेजारी राहणारा आजोबा गजानन भोम या दोघांना तातडीने अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील तिसरा आरोपी असलेला पीडितेचा काका सध्या फरार आहे. तो गेल्या २० दिवसांपासून पुणे येथे असल्याची माहिती समोर आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून शोषण
मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे वडील आणि काका गेल्या सहा महिन्यांपासून तिचे शोषण करत होते. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या आजोबानेही तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. शाळेतील शिक्षकांनी दाखवलेली सतर्कता आणि पोलिसांनी केलेली तातडीची कारवाई यामुळे या नराधमांचे कृत्य समोर येऊ शकले. पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.







